⚡बांदा ता.१३-: अष्टविनायक भजन मंडळ, न्हावेली पार्सेकरवाडी आयोजित संतरचित खुली अंभग गायन स्पर्धेत हेमंत गोडकर (तळवडे) याने प्रथम क्रमांक पटकावला. व्दितीय सर्वेश राऊळ (कोलगाव), तृतीय सुरज पार्सेकर (न्हावेली), तर उत्तेजनार्थ विभागून प्रथम कौस्तुभ धुरी (सातोसे), व्दितीय भावना परब (न्हावेली) यांनी मिळावला.
या स्पर्धेचे उद्घाटन शेख गुरुजी यांच्या हस्ते झाले.
यावेळी दिप्तेश मेस्री, भावेश राणे, कृष्णा नाईक, तुळशीदास पार्सेकर, सुंदर पार्सेकर, गोविंद गावडे, सिद्धेश पार्सेकर, प्रमोद पार्सेकर, नवनाथ पार्सेकर, संदिप दळवी, ज्ञानदेव पार्सेकर, आनंद नाईक, शेखर पार्सेकर, सुभाष पार्सेकर, दिपक पार्सेकर, प्रदिप पार्सेकर आदी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. एकूण ३६ संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचे परिक्षण शेख गुरुजी सावंतवाडी व दिप्तेश मेस्री न्हावेली यांनी केले. तर सूत्रसंचालन संदिप दळवी यांनी केले.
