⚡मालवण ता.१३-: चौके गावची ग्रामदेवता श्री देवी भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव बुधवार दि. १६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. यानिमित्त सकाळी ८ वाजता श्री भराडी देवीची पूजा नतंर श्री भराडी देवीची मानाची योटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर येणाऱ्या ओट्या भरण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. यावेळी नवस फेडणे नवस बोलणे त्यानंतर रात्रौ ११.३० वाजता वाजत गाजत श्री देवी भराडीची पालखी मिरवणूक होते. या पालखी मिरवणूकीमध्ये असंख्य भाविकांचा सहभाग असतो. त्यानतंर रात्रौ चेंदवणकर दशावतारी नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग (चालक सुधाकर दळवी) होणार आहे. तरी सर्व भाविकांनी या जत्रेला उपस्थित रहावे, असे आवाहन गांवकरी मंडळाने केले आहे.
चौके येथील भराडी देवीचा १६ रोजी जत्रोत्सव
