बांदा/प्रतिनिधी
मराठा समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्यासाठी बांदा येथे विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी (२७ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता बांदा देऊळवाडी येथील बांदा विकास सोसायटीच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.
या सोहळ्यात समाजातील कर्तृत्ववान व्यक्ती तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड झालेले ज्ञानेश्वर सावंत, राज्यस्तरीय निर्भीड पत्रकार पुरस्कार प्राप्त पत्रकार नीलेश मोरजकर आणि भाजपा बांदा युवा शहर अध्यक्षपदी निवड झालेले विकी कदम यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. समाजासाठी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे नियोजन समाजातील मार्गदर्शक मकरंद तोरस्कर, शामसुंदर धुरी, गुरुनाथ सावंत आणि विनोद सावळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. या सत्कार सोहळ्यास मराठा समाजातील बांधव, पदाधिकारी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
मराठा समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा २७ ऑगस्टला बांद्यात सत्कार
