मालवण (प्रतिनिधी)
परब मराठा समाज, मुंबई ‘महिला’ विभागाच्या वतीने बालदिन सोहळा व विद्यार्थी गुणगौरव सोहळा शनिवार दि. १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ ते रात्री ९ या कालावधीत अमर हिंद मंडळ, अमरवाडी, गोखले पथ (उत्तर), दादर, मुंबई येथे साजरा करण्यात येणार आहे.
याप्रसंगी ज्ञाती मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने संगीत, वेषभुषा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, बडबड गीत स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. तसेच यावेळी परब समाजातील इयत्ता १० वी परीक्षेत ७५ टक्के आणि इयत्ता १२ वी परीक्षेत ७५ टक्के व पदवी परीक्षेत ६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे सन्मान होणार असून अशा विद्यार्थ्यांनी गुणपत्रिकेची प्रत समाजाच्या दादर येथील कार्यालयात सायंकाळी ५ ते ८ या वेळेत (रविवार व्यतिरिक्त) दि. १५ नोव्हेंबर पर्यंत आणून द्यावीत. अधिक माहितीसाठी सौ. प्रतिक्षा प्र. परब (९८७०३३८४१८) किंवा श्री. शरद परब (९८६९३९०७५४) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
