Headlines

धाकोऱ्यात सड्यावरील दोन एकर क्षेत्रात गवारेड्यांकडून नाचणी, भुईमूगाची नासधूस

⚡बांदा ता.२१-: धाकोरा-सड्यावरील दोन एकर क्षेत्रात असलेल्या नाचणी व भुईमूग पिकाचे गव्या रेड्यांच्या कळपाने नुकसान केले आहे. भुईमूगाचे पीक पूर्णपणे तयार झालेले होते. मात्र गव्यांनी नासधुस केल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. यात आमचे अंदाचे 30 हजारांचे नुकसान झाले असून वनविभागाने पंचनामा करावा अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

Read More

प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांची तळेरे येथील “अक्षरघराला” भेट

निकेत पावसकर यांच्या अक्षरघर संकल्पनेचे केले कौतुक ⚡कणकवली ता.२१-: “अक्षरघरात” आगमन झाल्यानंतर पहिली मिळालेली प्रतिक्रीया “वाह खूपच सुंदर…”ही आपसुक मिळालेली प्रतिक्रीया उपविभागीय अधिकारी तथा कणकवली प्रांताधिकारी सौ.वैशाली राजमाने यांनी व्यक्त केली. एखादी उच्च पदस्थ व्यक्ती आपल्या आगळ्यावेगळया पत्र संग्रहाला अचानक भेट द्यायला येत असल्याचे ऐकून निकेत पावसकरही आनंदीत झाला. सुमारे दिड ते दोन तास केवळ…

Read More

जिल्हा क्रीडा संकुल ओरोस येथे 23 रोजी पुरुष व महिला गटाची जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा

⚡सावंतवाडी ता.२१-:सिंधुदुर्ग जिल्हा खो-खो असोसिएशनची २०२२-२३ ची पुरुष व महिला गटाची जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा दि. २३ ऑक्टोबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल ओरोस येथे आयोजित केली आहे. महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या ५८ व्या पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेत भाग घेणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिनिधीक संघातील खेळाडू निवडीसाठी ही…

Read More

वरवडे ग्रा.पं.तर्फे तंटामुक्त समिती अध्यक्ष हनुमंत बोंद्रे यांचा सत्कार

⚡कणकवली ता.२१-: वरवडे ग्रामपंचायत येथे वरवडे ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित तंटामुक्ती अध्यक्ष हनुमंत बोंद्रे यांचा भाजपा उपतालुकाध्यक्ष सोनू सावंत यांच्या हस्ते आणि सरपंच प्रभाकर बांदल यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी भाजप उपतालुकाध्यक्ष सोनू सावंत, संदीप चव्हाण, अण्णा साटम, सरपंच भाई बांदल, केंद्रप्रमुख मसुरकर, भाई बोंद्रे, संजय पोळ, विजय कोदे, मधुकर परब, धनंजय सावंत, अजिम कुडाळकर,…

Read More

कनेडी येथे गडग्यावर आणि घरावर कोसळली वीज

आठ महिला जखमी;विजेची उपकरणे देखील जळाली ⚡कणकवली ता.२१-: कणकवली तालुक्यातील कनेडी बाजारपेठ नजीक शिवाजीनगर येथील घराच्या गडग्यावर आणि वेरोनिका बेरनाद फर्नांडिस यांच्या घरावर गुरुवारी सायंकाळी 6.30 वा. च्या सुमारास वीज पडून आठ महिला जखमी झाल्या. त्यांच्यावर कनेडी येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. गुरुवारी सायंकाळी वेरोनिका बेरनाद फर्नांडिस यांच्या घरात ख्रिस्ती बांधवांकडून प्रार्थना सुरू असताना…

Read More

कर्मचाऱ्यांच्या पगाराखातीर राष्ट्रवादीची बीएसएनएल कार्यालयावर धडक

दिवाळी पूर्वी दोन महिन्याचा पगार देण्याचे दिले आश्वासन : पुंडलिक दळवींच्या नेतृत्वाखाली धडक सावंतवाडी ता.२१-: गेले २८ महिने बीएसएनएल कर्मचाऱ्यांचे पगार न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी येथील सावंतवाडी बीएसएनएल कार्यालयात धडकले व अधिकाऱ्यांना जाब विचारला. कर्मचाऱ्यांना पगार किती दिवसात मिळेल याची हमी द्या त्यानंतर आम्ही कार्यातून बाहेर पडणार असल्याचा इशारा दिल्यानंतर दिवाळी पूर्वी आम्ही दोन…

Read More

सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या कार्यकारी समितीवर किरण सामंत, प्रमोद जठार यांनी नियुक्ती करा

शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी ⚡कणकवली ता.२१-: सिंधूरत्न समृद्ध योजनेच्या कार्यकारी समितीवर माजी आमदार प्रमोद जठार व उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू उद्योजक किरण सामंत यांची या समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्त करण्यात यावी अशी मागणी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. सिंधूरत्न समृद्ध…

Read More

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन दर महिन्याच्या १ तारखेलाच जमा करा

कणकवली पंचायत समिती पेन्शन अदालतीत मागणीला प्रतिसाद ⚡कणकवली ता २१-: कणकवली विकास गटाच्या पंचायत समितीची पेन्शन अदालत गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या अदालतीत सेवानिवृत्त कर्मचा-यांची पेन्शन दर महाच्या १ तारखेलाच व्हावी हा पहिला मुद्दा होता. त्याला पिठासन अधिकारी यांनी जिल्ह्याहून येणाऱ्या रकमेबाबत मला निश्चित काही सांगता येणार नाही परंतु माझ्या कार्यालयाकडे…

Read More

सावंतवाडीतील बांधकाम विभागाकडून जनतेच्या पैशाचा अपव्यय

माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांचा आरोप : अधिकारी व ठेकेदारांची मिलीभगत ⚡सावंतवाडी ता.२१-: सावंतवाडीतील बांधकाम विभाग जनतेच्या पैशाचा अपव्यय करत असून, गरज नसलेल्या भागात दिशादर्शक फलक लावून, अधिकारी व ठेकेदारांकडून जनतेच्या पैशावर ताव मारला जात असल्याचा आरोप माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी केला आहे.

Read More

एसटी व स्विफ्ट कार मध्ये अपघात…

मोती तलाव परिसरातील घटना; कारचे नुकसान ⚡सावंतवाडी ता.२१-:येथील मोती तलावाच्या परिसरात एस्टी बस आणि स्विफ्ट कार यांच्यात अपघात झाला असून, या अपघातात कारचे नुकसान झाले आहे. मात्र या अपघात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. हा अपघात आज दुपारी पावणे बाराच्या सुमारास घडला आहे.

Read More
You cannot copy content of this page