मनसे प्रमुख राज ठाकरे 30 नोव्हेंबरपासून सिंधुदुर्ग दौऱ्यावर

अनेक पक्षातील कार्यकर्ते मनसेत प्रवेश करणार:परशुराम उपरकर

⚡कणकवली ता.१९-: मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे हे
कोल्हापूर येथून ३० नोव्हेंबर रोजी सावंतवाडी आंबोली मार्गे सिंधुदुर्गात येणार आहेत.राज ठाकरे यांचे सावंतवाडी गवळी तिठा येथे स्वागत होणार आहे.त्यानंतर मळगाव मार्गे हायवे येथील आराध्य हॉटेल कुडाळ येथे राज ठाकरे यांचा मुक्काम होणार आहे,मनसे नेते अमित ठाकरे ,आ.राजू पाटील, नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर ,शिरीष सावंत आदी नेते या दौऱ्यात असणार आहेत.
राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये अनेक पक्षातील कार्यकर्ते मनसेत प्रवेश करणार असल्याची माहिती मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिली.

कणकवली येथील मनसे कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री उपस्थित होते.

मनसे प्रमुख राज ठाकरे हे १ डिसेंबरला सावंतवाडी,दोडामार्ग, वेंगुर्ला विधानसभा कार्यकर्त्यांची १० वाजता बैठक घेतील.कुडाळ तालुका ११ वाजता भव्य स्वागत,त्यानंतर मराठा मंडळ येथे बैठक होणार आहे.मालवण येथे भव्य स्वागत होईल,त्यानंतर सायंकाळी ४ वाजता मालवण तालुका कार्यकर्त्यांची बैठक आणि मुक्काम मालवण येथे असणार आहे.

२ डिसेंबरला राज ठाकरे सकाळी आगणेवाडी देवीचे दर्शन,तेथून कणकवली पटवर्धन चौक येथे कार्यकर्त्यांच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे.त्यानंतर ११ वाजता मान्यवरांच्या गाठीभेटी,कणकवली विधानसभा कार्यकर्त्यांची दुपारी ३ वाजता बैठक,नागरिकांच्या गाठीभेटी व निवेदन स्वीकारणार आहेत,अशी माहिती मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page