केशवसुत कट्ट्याची बबन साळगावकर यांच्याकडून पाहणी

जेष्ठ नागरिकांची काम पाहण्याची होती मागणी;थोडाफार बदल करण्याची आहे मागणी*

⚡सावंतवाडी ता.२९-: शहरातील केशवसुत कट्ट्यावरच्या सध्या स्थितीमध्ये तुतारीच्या आजूबाजूच्या परिसराची बैठक व्यवस्था व फ्लोरिंगचे बांधकाम करण्यात येत आहे. “त्या” कामाची पाहणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली. दरम्यान कामामध्ये काही बदल व त्रुटी लक्षात घेऊन त्यामध्ये थोडाफार बदल करावा यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी साळगावकरांचे लक्ष वेधलं आहे. त्या विनंतीचा मान ठेवून साळगावकर यांनी केशवसुत कट्ट्याला आज भेट दिली.

त्यावेळी ज्येष्ठ नागरिक व माजी बँक कर्मचारी प्रदीप ढोरे उपस्थित होते. त्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या मतानुसार थोडाफार बदल करावा, असे सुचवले. त्यावेळी नगरपालिकेचे बांधकाम अधिकारी कुडपकर यांना त्या ठिकाणी बोलवून त्यांच्याकडून बांधकामा विषयी माहिती घेतली व त्यानुसार ज्येष्ठ नागरिकांच्या मागणीनुसार काही समस्या असतील तर त्या दूर करा अशी विनंती त्यांनी सदर अधिकाऱ्यांना केली.

तुतारी परिसराच्या नूतनीकरणासाठी दहा लाख रुपये निधी उपलब्ध करून देणारे नाम दीपक भाई केसरकर यांचे त्यांनी विशेष आभार मानले.

You cannot copy content of this page