प्लास्टिक गोळा करीत प्लास्टिक निर्मुलनाचा दिला संदेश

शहरातील तृतीय वर्षातील विद्यार्थी व प्राध्यापक यांनी राबविला उपक्रम

⚡सावंतवाडी ता.२९-: उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे व सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आज सावंतवाडी शहरामधील विविध भागात तृतीय वर्षाचे सर्व विद्यार्थी व प्राध्यापक वर्गाने मिळून शहरातील प्लॅस्टिक कचरा गोळा करून प्लॅस्टिक निर्मूलनाचा संदेश नागरिकांना दिला.

याप्रसंगी सावंतवाडी नगरपरिषदेचे उद्यान पर्यवेक्षक श्री.गजानन परब व आरोग्य विभाग प्रमुख सौ. रसिका नाडकर्णी यांनी सर्वांना हरित शपथ दिली. त्यानंतर सर्वांनी मिळून सावंतवाडी शहरातील शिल्पग्राम,मुख्य बाजारपेठ, वाघ पाणंद, मच्छी मार्केट व तलाव परिसर इत्यादी विविध ठिकाणी जाऊन मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक गोळा केले.

सदर मोहिमेमध्ये महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.संदीप गुरव, डॉ. गिरीश उईके व प्रा. हर्षवर्धन वाघ, सहाय्यक कुलसचिव श्री. विलास यादव व वाहन चालक श्री.राजू पावसकर या सर्वांनी विद्यार्थ्यां सोबत सक्रिय सहभाग घेतला

You cannot copy content of this page