देवगड तालुक्यात ११ जागांसाठी होणार मतदान ; ५३ हजार १४२ मतदार बजावणार मतदानाचा हक्क…

१० जागा बिनविरोध आल्याने २६ हजार ८९४ मतदार मतदानापासून राहिले वंचित..

⚡देवगड ता.०६-:
देवगड तालुक्यात ७ जि.प.व १४ पं.स. निवडणुक आहे.मात्र त्यात १० उमेदवार बिनविरोध आल्या आहेत.आज ७ रोजी मतदान होत असून देवगड तालुक्यात एकूण ८० हजार ३६ एवढी मतदारांची संख्या आहे. त्यात एकूण १० जागा बिनविरोध आल्या असून यामुळे २६ हजार ८९४ मतदान करण्यापासून वंचित राहिले आहेत.आता उर्वरित एकूण ११ जागेसाठी ५३ हजार १४२
मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.यामध्ये २६ हजार ४६५ स्त्री मतदार तर २६ हजार ६७७ पुरुष मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

देवगड तालुक्यातील सात जि.प.गटापैकी पडेल, बापर्डे , किंजवडे व पोंभुर्ले या गटातील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत तर चौदा पं.स.गणापैकी पडेल, नाडण, बापर्डे, फणसगाव, शिरगांव, कोटकामते या सहा गणातील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत यामुळे उर्वरीत तीन जि.प.गट व आठ पं.स.गणांच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत असून यामध्ये दोन माजी सभापती, दोन तालुकाप्रमुख, माजी जि.प.सदस्य व सरपंच अशा रिंगणात असलेल्या दिग्गज उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. मतदानासाठी निवडणुक यंत्रणा सज्ज झाली असून तालुक्यातील 82 केंद्रावर मतदान होणार आहे.तीन जि.प.गटासाठी 9 तर आठ पं.स.गणासाठी 16 उमेदवार रिंगणात आहेत.

जि.प.व.पं.स.निवडणुकीच्या महासंग्रामाची सत्वपरिक्षा आज होणार आहे.मतदानातून उमेदवारांचे भवितव्य आज पेटीबंद होणार असून मतदारराजा कोणाला कौल देणार हे सोमवारी मतमोजणीअंती स्पष्ट होणार आहे.

देवगड तालुक्यातील 7 जि.प.गट व 14 पं.स.गणासाठी निवडणुक प्रक्रिया सुरू झाली.यामध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवशी काही मतदारसंघांचे चित्र स्पष्ट झाले यामध्ये जि.प.गटात पडेल गटातून भाजपाच्या सुयोगी घाडी, बापर्डे गटातून भाजपाच्या अवनी तेली, पोंभुर्ले गटातून भाजपच्याच अनुराधा नारकर तर किंजवडे मधून सावी लोके बिनविरोध निवडून आल्या

तर 14 पं.स.गणामधील पडेल गणातून भाजपाचे अंकूश ठुकरूल, बापर्डे गणातून भाजपाच्या सौ.संजना लाड, नाडण गणातून गणेश राणे, फणसगाव गणातून समृध्दी चव्हाण, शिरगाव गणातून शीतल तावडे, कोटकामते मधून ऋतुजा खाजणवाडकर हे सहा भाजपाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले.

आता जि.प.गटातील उर्वरीत पुरळ, शिरगाव आणि कुणकेश्वर गटासाठी आज निवडणुक होत असून पं.स.गणातील उर्वरीत पुरळ, तिर्लोट, मणचे, पोंभुर्ले, तळवडे, किंजवडे, मुणगे, कुणकेश्वर या गणांमध्ये निवडणुक होत आहे.देवगड तालुक्यात एकूण मतदारांची संख्या 80 हजार 36 आहे.

त्यातील सहा पंचायत समिती गण आणि चार जि.प.गट बिनविरोध झाल्याने आता उर्वरीत 11 जागांसाठी मतदान होणार आहे.यामध्ये 53 हजार 142 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.मतदानासाठी निवडणुक यंत्रणा सज्ज झाली असून निवडणुक निर्णय अधिकारी नितीन राऊत व सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार आर.जे.पवार यांच्या मार्गदर्शनाखाल निवडणुक यंत्रणा मतदान केंद्रावर सज्ज झाली आहे.

एकूण 82 केंद्रावर प्रत्येकी एक केंद्राध्यक्ष, एक तीन मतदान अधिकारी,एक पोलिस कर्मचारी तसेच अन्य कर्मचारी कार्यरत आहेत.पोलिस यंत्रणाही सज् ज झाली असून पोलिस निरिक्षक भरत धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तीन सहाय्यक पोलिस निरिक्षक, पाच पोलिस उपनिरिक्षक, 114 पोलिस कर्मचारी, राज्य राखीव दलाची एक तुकडी, 182 होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.सोमवारी देवगड तहसिल कार्यालयात मतमोजणी होणार आहे.

You cannot copy content of this page