⚡वेंगुर्ला ता.०६-: शनिवारी 7 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जि. प. व पं. स. निवडणुकीसाठी
वेंगुर्ला तालुक्यातून अधिकाऱ्यांसह आज शुक्रवारी मतदान यंत्रे मतदान केंद्रावर रवाना झाली. सकाळी
निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या उपस्थितीत एस. टी. बसेस मतदान केंद्रावर रवाना झाल्या.
यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजन गवस व दिनेश पाटकर, अतिरिक्त
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत किरुळकर, अन्य आदी उपस्थित होते. तालुक्यात एकूण 87 केंद्रावर मतदान प्रक्रिया होणार असून 87 बॅलेट युनिट देण्यात आली आहेत. तसेच मशीनमध्ये बिघाड झाल्यास प्रत्येक गणासाठी 2 अशी 20 बॅलेट मशिन्स राखीव उपलब्ध असणार आहेत. तसेच अतिरिक्त जादा 30 मशिन्सचा कोटा उपलब्ध ठेवण्यात आला आहे. यामध्ये सखी केंद्र – कै. रायसाहेब डाॅ. रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नं 1.
युवा केंद्र – जि.प. पुर्ण प्राथमिक केंद्रशाळा परुळे नं 3. आदर्श केंद्र – जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक शाळा आडेली नं. 1. अशी रचना आहे. राखीवसह एकूण 384 अधिकारी – कर्मचारी, 9 पोलीस अधिकारी, 87 पोलीस, 73 होमगार्ड उपलब्ध असणार आहे. संपूर्ण तालुक्यासाठी वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी व निवती एपीआय भीमसेन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.जि. प. व पं. स. साठी प्रत्येक मतदान केंद्रावर एक बॅलेट युनिट वापरण्यात येणार असून एकाच बॅलेट युनिट वर 2 मते नोंदवावी लागणार आहेत. सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार ओतारी यांनी केले आहे.
वेंगुर्ला तालुक्यात निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज ; ओंकार ओतारी…
