*शिरोडा येथील रक्तदान शिबीरात 50 जणांचे रक्तदान

सलग 24 व्यावर्षी सामाजिक कार्यकर्ते नितीन परब मित्रमंडळाचे आयेाजन

⚡वेंगुर्ले ता.२९-: शिरोडा पंचक्रोशीतील सामाजिक कायकर्ते नितीन परब यांच्या 56 व्या वाढदिवसाच्या औचित्य साधून सलग 24 व्यावर्षी शिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरास रक्तदात्यांकडून उlस्फुर्त प्रतिपाद लाभला. या रक्तदान शिबीरात 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
शिराडा येथील उपजिल्हा रूग्णालयात नितिन परब मित्र मंडळ व ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना गांधीचौक शिरोडा यांनी नितीन परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराचे उदघाटन सामाजिक कार्यकर्ते योगेश प्रभू यांच्या हस्ते झाले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते नितीन परब मित्र मंडळ, सौ. निकिता परब व ऑटो रिक्षाचालक-मालक संघटना, गांधीचौक शिरोडा हे गरजू रुग्णांची गैरसोय होऊ नये याकरीता गेली 23 वर्षे चालक-मालक संघटना गांधीचौक शिरोडा हे संयुक्त रित्या हा उपक्रम राबवित आहेत. कोविडचा कालावधी सोडता सातत्याने असे उपक्रम राबवणारी हि मोजक्या संस्थापैकी नितीन परब मित्र मंडळ व ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना गांधीचौक शिरोडा यांचे नाव जिल्हयामध्ये अग्रक्रमाने घेतले जाते. एक आदर्शवंत उपक्रमाने जनतेची सेवा हे करीत आहेत. हे शिरोडा गावास भूषणावह आहे. असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते योगेश प्रभू यांनी केले.
सदर रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी जिल्हा सिव्हील हॉस्पीटल ओरोस व उप जिल्हा रुग्णालय शिरोडा यांचे मोलाचे सहकार्य लाभले. हा उपक्रम सातत्याने सतत 23 वर्षे यशस्वी होण्या करीता नितिन परब यांच्या पत्नी व सिंधुदुर्ग जि.प.च्या माजी अध्यक्षा सौ. निकिता परब यांसह ऑटो रिक्षाचालक-मालक संघटना, गांधीचौक शिरोडा मोलाचा सहभाग आहे. या जनतेसाठी आवश्यक राबविलेल्या उपक्रमाबद्दल उपस्थित आणि नितीन परब यांना शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page