श्री स्वामी समर्थ पादुकांचे बांद्यात स्वागत
⚡बांदा ता.२९-: श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ,अक्कलकोट य़ांच्यावतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या श्री स्वामी समर्थ पादुका फेरीचे गुरुवारी बांदा येथे मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले.दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी 9 वाजता बांदा येथिल श्री विठ्ठल मंदिरात पादुकांचे आगमन झाले. त्यानंतर पादुकांचे पुजन,नैवेद्यार्पण होऊन आरती करण्यात आली.बांदा येथिल स्थानिक भजनकर्मी…
