उपसरपंचपदी पी.के,चौकेकर यांची बिनविरोध*
⚡मालवण ता.२९-: चौके ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच म्हणून चौके गाव विकास आघाडी चे श्री गोपाळ सहदेव चौकेकर -गोपाळमामा हे निवडून आल्यानंतर उपसरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत चौके गावविकास आघाडीचे पी के चौकेकर हे बिनविरोध निवडून आले
ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि चौके गावविकास आघाडी यांच्यात लढत झाली होती..भाजप चे माजी सरपंच सह एकूण ५ सदस्य निवडून आले होते तर चौके गावविकास आघाडीचे सरपंचपदाचे उमेदवार आणि ४ सदस्य निवडून आले होते.नवीन नियमावलीनुसार सरपंच यांना २ मते देण्याचा अधिकार मिळाल्याने चौके गावविकास आघाडीला उपसरपंच पदासाठी बहुमत झाल्याने श्री पी.के.चौकेकर यांनी उपसरपंचपदा साठी अर्ज दाखल केला होता..इतर कोणीही या पदासाठी अर्ज दाखल न केल्यामुळे पी.के चौकेकर यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीसाठी निवडणूक अधिकारी श्री दत्तात्रय भाऊसो कांबळे व प्रभारी ग्रामसेवक श्रीमती शुभदा रामचंद्र कोठावळे यांनी सरपंच ,उपसरपंच यांचे स्वागत करुन शुभेच्छा दिल्या.यावेळी नुतन ग्रा.प.सदस्य श्री दुलाजी चौकेकर,श्री.शिवदास मांजरेकर,सौ.विशाखा चौकेकर, सौ. सुचिता पोळ, सौ अक्षता गायकवाड, सौ.जयश्री चौकेकर,सौ आनंदी चौकेकर उपस्थित होते.ग्रामस्थ संजय गावडे, बिजेंद्र गावडे,अजित पार्टे,मंदार गावडे,संतोष गावडे,महेश सावंत,शिवप्रसाद चौकेकर,विष्णू चौकेकर,नंदू राणे,नाना देसाई,विलास आंबेरकर,गणेश चौकेकर,हेमंत गावडे,उमाकांत गावडे यांनी शुभेच्छा दिल्या निवडीनंतर सरपंच उपसरपंच या दोघांवर सर्वच स्तरावरुन अभिनंदन होत आहे..
