⚡मालवण ता.२९-: मालवण तालुक्यातील पळसंब ग्रामपंचायत उपसरपंचपदी अविराज अंकुश परब ( शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे ) बिनविरोध निवड झाली आहे .
यावेळी निवडणूक अधिकारी श्री. सवंगडे, पळसंब सरपंच श्री . महेश वरक, माजी सरपंच श्री . चंद्रकांत गोलतकर, माजी उपसरपंच श्री .सुहास सावंत, ग्रामसेवक श्री .अमित कांबळी, नवनिर्वाचित सदस्य श्री . सत्यवान तेजम , श्री . संतोष परब, सौ .स्मिता जुवेकर, सौ . राधिका तर्फे, सौ . रसिका साटम, सौ . ऋतुजा सावंत, माजी सदस्य श्री अरुण माने, सौ.उज्वला परब, सौ . प्रणिता पुजारे सौ . सिमा चव्हाण, ग्रामस्थ श्री.सुभाष तर्फे, कर्मचारी शैलेंद्र अणावकर, सौ.सलोनी पाटकर उपस्थित होते.
त्यावेळी नवविर्वाचित सरपंच श्री.महेश वरक व उपसरपंच श्री.अविराज परब यांचा ग्रामपंचायत च्या वतीने श्री .चंद्रकांत गोलतकर यांनी अभिनंदन केले व पळसंब गावाच्या सर्वागीण विकासासाठी पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
