⚡बांदा ता.२९-: श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ,अक्कलकोट य़ांच्यावतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या श्री स्वामी समर्थ पादुका फेरीचे गुरुवारी बांदा येथे मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले.दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी 9 वाजता बांदा येथिल श्री विठ्ठल मंदिरात पादुकांचे आगमन झाले. त्यानंतर पादुकांचे पुजन,नैवेद्यार्पण होऊन आरती करण्यात आली.बांदा येथिल स्थानिक भजनकर्मी सेवेकरी तसेच घारपी येथील श्री स्वामीभक्त भजनकर्मी यांनी यावेळी श्री स्वामीचरणी भजन व नामस्मरण सेवा अर्पण केली. भाविकांनी दर्शन घेतल्यानंतर नियोजित कार्यक्रमानुसार
ठीक 11 वाजता पालखीचे पुढे घारपी मठ येथे प्रस्थान झाले. भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनाचा लाभ घेतला.
