तालुक्यात आठ पैकी सहा ठिकाणी भाजपाचे उपसरपंच

⚡वेंगुर्ला ता.२९-: वेंगुर्ला तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी २७ डिसेंबरला निवडणुक झाल्यानंतर उर्वरित राहिलेल्या आठ ग्रामपंचायतीच्या उसरपंच पदासाठी आज निवडणुक घेण्यात आली. त्यात अणसूर व रेडी याठिकाणी निवडणुक घेण्यात आली तर आडेली, चिपी, परुळेबाजार, होडावडा, कोचरा याठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली. आठ पैकी सहा ग्रामपंचायतीवर भाजपाचे उपसरपंच विराजमान झाले असून कोचरा व मेढा येथे महाविकास आघाडीचे उपसरपंच विजयी झाले.
आडेली ग्रामपंचायतीच्या सरपंच यशस्वी कोंडस्कर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत भाजपाचे आडेली बुथ अध्यक्ष परेश हळणकर यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. येथे एकात्मिक बाल विकास प्रकल्पाचे विस्तार अधिकारी जयेश राऊळ यांनी निरिक्षक म्हणून काम पाहिले.
चिपी ग्रामंपचायतीच्या सरपंच माया माडये यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत भाजपाचे माजी सरपंच प्रकाश चव्हाण यांची उसरपंचपदी निवड झाली. येथे पंचायत समितीचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी संतोष चव्हाण निरीक्षक म्हणून काम पाहिले. परुळेबाजार ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रणिती आंबडपालकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत भाजपाचे शक्तीकेंद्र प्रमुख संजय दुधवडकर यांची बिनविरोध निवड झाली. येथे कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रशांत भोगटे यांनी निवडणूक निरिक्षक म्हणून काम पाहिले. होडावडा ग्रामपंचायतीच्या सरपंच रसिका केळुसकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत भाजपाचे राजबा सावंत यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड झाली. पंचायत समितीचे सहाय्यक लेखाधिकारी दिनकर चाटे यांनी निरिक्षक म्हणून काम पाहिले. कोचरा सरपंच योगेश तेली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत महाविकास आघाडीचे गुरुनाथ शिरोडकर हे उपसरपंचपदी निवडून आले. येथे निवडणूक नायब तहसिलदार लक्ष्मण फोवकांडे यांनी निरिक्षक म्हणून काम पाहिले.
रेडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक सरपंच रामसिग राणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. येथे भाजपाच्या नमिता नागोळकर व स्वप्नील राणे या दोघांनी उपसरपंच पदासाठी उमेवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, स्वप्नील राणे व तीन सदस्य निवडणुकीच्यावेळी गैरहजर राहिल्याने हात वर करुन घेण्यात आलेल्या मतदानात नमिता नागोळकर यांना उपस्थित नऊ सदस्य व सरपंच यांनी मतदान केल्याने त्यांना दहा मते मिळून त्या विजयी झाल्या. तेथे कृषी अधिकारी विद्याधर सुतार यांनी निरिक्षक म्हणून काम पाहिले.
अणसूर ग्रामपंचायतीची सभा सरपंच सत्यविजय गावडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. येथे उपसरपंच पदासाठी भाजपाच्या वैभवी मालवणकर व साक्षी गावडे यांच्यात लढत होऊन मालवणकर विजयी झाल्या. गावडे यांना तीन तर मालवणकर यांना पाच मते मिळाली. येथे विस्तार अधिकारी संदेश परब यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले.
फोटोओळी – आडेली येथे भाजपाचे बुथ अध्यक्ष परेश हळणकर यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी त्यांचे अभिनंदन केले.

You cannot copy content of this page