डॉ. प्रसाद देवधर;कणकवली महाविद्यालयाच्या
राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिरात मार्गदर्शन
⚡कणकवली ता.२९-:.गावामध्ये स्वयंरोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील युवकांनी नोकरीपेक्षा रोजगाराकडे वळावे. आज तरुण शहराकडे स्थलांतर करीत आहे. त्यांना या पर्यायाचा विचार करावा असे मत भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.प्रसाद देवधर यांनी व्यक्त केले.
कणकवली महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या पहिल्या दिवशी डॉ.प्रसाद देवधर यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रम अधिकारी प्रा.सुरेश पाटील ,प्रा. सागर गावडे ,प्रा.आदिती मालपेकर ,प्रा. विनया रासम आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्गात कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, पर्यटनावर आधारित व्यवसाय यात स्वयंरोजगार खूप संधी उपलब्ध आहेत आहेत व तरुणांना या व्यवसायामार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थिर होण्यासाठी वाव आहे ,असे मत डॉ. प्रसाद देवधर यांनी व्यक्त केले. युवकांनी नोकरीच्या मागे न लागता आपल्या पायावर उभे राहण्यासाठी विविध उद्योगधंदे उभारण्यासाठी प्रयत्न करावा. आता शासन अशा उद्योजकांना कर्जपुरवठा देखील करते.
कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना रायगड गटाच्या स्वयंसेवकांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मिताली पराष्टेकर व मयुरी राऊळ यांनी केले. तर शेवटी कृती गोसावी यांनी आभार मानले. या शिबिरामध्ये 150 विद्यार्थी सहभागी झाले.
