Headlines

सावंतवाडी पत्रकार संघाची २० रोजी क्रिकेट स्पर्धा

जिल्ह्यातील पत्रकारांसाठी करण्यात आले आहे आयोजन ⚡सावंतवाडी ता.११-: सावंतवाडी तालुका पत्रकार संघातर्फे 20 जानेवारी रोजी जिमखाना मैदानावर जिल्ह्यातील पत्रकारांसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे पत्रकारांना नेहमीच्या कामातून विरंगुळा मिळावा म्हणून सलग दुसऱ्या वर्षी या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी खास समितीही स्थापन करण्यात आली आहे या समितीच्या प्रमुखपदी सचिन रेडकर यांची…

Read More

सावंतवाडी तालुक्यातील धार्मिक स्थळांच्या आवाजावर निर्बंध घाला

अन्यथा कारवाई करा;मनसे शिष्टमंडळाची पोलीस निरीक्षकांकडे मागणी ⚡सावंतवाडी ता.११-: सावंतवाडी तालुक्यातील प्रार्थना स्थळावरील आवाजावर मर्यादा घालण्यात यावी तसेच याबाबत योग्य ती कार्यवाही न झाल्यास त्यांच्यावर कारवाई केली जावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडदळाने सावंतवाडी पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांची भेट घेऊन केली यावेळी त्यांनी निवेदन ही सादर केले. याबाबत योग्य ती कारवाई केली जाणार…

Read More

बांदा दीपावली शो टाईम परिवाराचा स्नेहमेळावा १३ रोजी

स्वामी समर्थ सांस्कृतिक सभागृहात पार पडणार कार्यक्रम ⚡बांदा ता.११-: संयोजक मनोज गोवेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या दिपावली शोटाईम या कार्यक्रमाने सतत २० वर्षे रसिकांच्या मनात अधिराज्य गाजवले. आजही सर्वाच्या मनात आपले स्थान अबधित ठेवुन आहे. कित्येक कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणारा, विविध सामाजीक व सांस्कृतिक उपक्रम करणारा शोटाईम परीवार आजही बांदा शोटाईम ग्रुप या नावाने कार्यरत आहे….

Read More

नवाबाग येथील मंजूर ब्रेक वॉटर बंधाऱ्याची केंद्रीय समिती कडून पाहणी…

मच्छीमारांना फायदेशीर ठरेल असाच बंधारा उभारणार : दिले आश्वासन ⚡वेंगुर्ले ता.११-: वेंगुर्ले नवाबाग येथील मंजूर असलेल्या ब्रेक वॉटर बंधाऱ्याची पाहणी आज फिशरीज आणि मेरीटाईम बोर्डच्या केंद्रीय समितीने केली. नवाबाग किनाऱ्यापासून बंदरापर्यंत अशा या 500 मीटर लांबीच्या बांधार्‍याला मंजुरी मिळाली आहे. दरम्यान समितीने मच्छीमारांची चर्चा करून मच्छीमारांबरोबर सर्वांना फायदेशीर ठरेल असाच बंधारा उभारला जाईल असे आश्वासन…

Read More

हडी येथिल नेत्र चिकित्सा शिबिराचा ८० रुग्णांना लाभ

⚡मालवण ता.११-: फेस्कोम संलग्न जेष्ठ नागरिक सेवा संघ हडीच्या वतीने जेष्ठ नागरिक व ग्रामस्थांची मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा ८० नेत्र रुग्णांनी लाभ घेतला. त्यापैकी २० रूग्णांवर अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यावेळी विवेकानंद नेत्रालय कणकवलीचे डॉ.संदीप कदम, सौ रूपा सांडव उपस्थित होते. शुभारंभ प्रसंगी अशोक कांबळी, अध्यक्ष…

Read More

रोटरी क्लब, मालवणतर्फे स्कॉलरशिप सराव परिक्षेचे आयोजन

⚡मालवण ता.११-: रोटरी क्लब मालवण तर्फे दरवर्षीप्रमाणे २०२२- २३ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता ५ वी व ८ वी ची शिष्यवृत्ती सराव परिक्षा रविवार दि. २९ जानेवारी रोजी टोपीवाला हायस्कूल, मालवण येथे घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी आपली नावे लिमये हॉस्पीटल मालवण येथे नोंदवावीत. परिक्षा प्रवेश शुल्क दोन्ही वर्गांसाठी ५० रु. आहे. इंग्रजी व…

Read More

रामचंद्र वालावलकर यांना कथामालेचा सेवामयी शिक्षक पुरस्कार प्रदान…

⚡सावंतवाडी ता.११-: “साने गुरुजी कथामाला हे गुरुजींच्या विचाराने मंतरून गेलेलं एक झाड आहे. कथामालेचे व्रत शिक्षकांकडून एकदा स्वीकारले गेले की विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकासाचे अनेक उपक्रम शिक्षकांच्या हातून उत्साहाने घडत जातात,” असे उद्गार श्री. रामचंद्र आंगणे, उपशिक्षणाधिकारी जि. प. सिंधुदुर्ग यांनी साने गुरुजी कथामाला मालवणच्या ‘सेवामयी शिक्षक पुरस्कार’ वितरण सोहळ्याच्या प्रसंगी काढले. माडखोल, सावंतवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख…

Read More

वाहतूक व सुरक्षा नियमांचे पालन करणे प्रत्येकांची जबाबदारी

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी ⚡सिंधुदुर्गनगरी ता.११-: अपघातामध्ये आपले जवळचे नातेवाईक जखमी झाले किंवा दगावले तरच आपल्याला अपघाताची गंभीरता कळते. रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक व सुरक्षा नियमांचे पालन करणे प्रत्येकांची जबाबदारी आहे. 2023 वर्षामध्ये अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करु या, असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले. जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, परिवहन विभाग, पोलीस विभाग,…

Read More

मानसिकता चांगली ठेवून सेवा बजावणे गरजेचे

हेड कॉन्स्टेबल राजन जाधव यांचे आवाहन;रापम सुरक्षितता अभियान कार्यक्रम देवगड आगारात संपन्न ⚡देवगड ता.११-: रापम सेवा बजावीत असताना आपल्या खाकी वर्दीचा अभिमान बाळगावा त्याचबरोबर सेवेवर रुजू झाल्यानंतर आपण सेवा संपवून परत येणार अशी प्रतीक्षा करणारे कुटुंबाचे भान ठेवून आपली मानसिकता चांगली ठेवून सेवा बजाविणे गरजेचे आहे.जेणेकरून आपण अधिक सुरक्षितपणे सेवा पार पाडू शकतो यासाठी व्यसनांपासून…

Read More

भुवनेश्वर येथील राष्ट्रीय कला उत्सव स्पर्धेत वराडकर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा सहभाग

दोन विद्यार्थ्यांनी केले राज्याचे प्रतिनिधित्व ⚡ओरोस ता.११-: भुवनेश्वर,ओडीसा येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील कला उत्सव स्पर्धेत मालवण तालुक्यातील कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मुलांनी सहभाग घेतला होता. कुमारी प्रतीक्षा निळकंठ मेस्त्री हिने खेळणी बनवणे या कला प्रकारात तसेच पूर्वा रामदास चांदरकर हिने नाट्य या कला प्रकारात सहभाग नोंदविला. माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमधील…

Read More
You cannot copy content of this page