Headlines

वैभव नाईकांवर आरोप करणाऱ्यांनी आधी स्वतःचा राजकीय इतिहास तपासावा…

धीरज मेस्त्री:नीलेश राणेंच्या राजकीय कामगिरीवरही उपस्थित केला सवाल..

⚡कणकवली ता.२२-: माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर आरोप करणाऱ्यांनी आधी स्वतःचा राजकीय इतिहास तपासावा, असा जोरदार पलटवार कलमठ युवासेना शहरप्रमुख धीरज मेस्त्री यांनी केला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या राजकीय वातावरणात मेस्त्री यांनी विजय इंगळे यांच्यासह विरोधकांवर निशाणा साधत, जनतेच्या विश्वासावर प्रश्न उपस्थित करण्यापूर्वी स्वतःच्या राजकीय कामगिरीचा हिशेब देण्याचे आव्हान दिले.

विजय इंगळे यांनी निष्ठेबाबत बोलण्यापूर्वी स्वतःची निष्ठा तपासावी, असा टोला लगावत धीरज मेस्त्री म्हणाले, घंटा चोरांनी निष्ठेचे धडे देऊ नयेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे स्थानिक राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना पुन्हा धार आली आहे.

नीलेश राणे यांच्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरीचा संदर्भ देत मेस्त्री यांनी २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनतेने त्यांना नाकारल्याची आठवण करून दिली. दुसऱ्यांच्या जनाधारावर प्रश्न उपस्थित करण्याआधी स्वतःच्या राजकीय कामगिरीचा हिशेब द्या, असे आव्हान त्यांनी दिले.

दरम्यान, राजकीय टीका करताना गुंडागर्दीची भाषा वापरली जात असेल तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराही मेस्त्री यांनी दिला. प्रत्येक दादागिरीला जशास तसे उत्तर दिले जाईल. आरोपांपेक्षा कामावर बोला आणि जनतेचा विश्वास मिळवा, असे त्यांनी स्पष्ट केले.

धीरज मेस्त्री यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आगामी काळात स्थानिक राजकारणातील आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page