Headlines

मठ हायस्कुलच्या संस्कृत शिक्षिका सुमन खोत यांचे निधन…

⚡वेंगुर्ला ता.२२-: वेंगुर्ला शहरातील महाजनवाडा येथील रहिवासी व तालुक्यातील डॉ. रा. धों. खानोलकर हायस्कुल मठ मध्ये ३० वर्षे चांगली सेवा दिलेल्या व रा. कृ.पाटकर हायस्कूल वेंगुर्ला मधून सेवानिवृत्त झालेल्या
माध्यमिक शिक्षिका
सुमन अनंत परब – खोत ( वय 81) यांचे गुरुवारी 20 ऑगस्ट रोजी सकाळी निधन झाले. हायस्कुलमध्ये त्यांनी मराठी, संस्कृत व चित्रकला विषय शिक्षिका म्हणून चांगले काम केले होते. तसेच वेंगुर्ला नगरवाचनालय मध्ये संचालक म्हणून काम केले होते. त्यांच्या पश्चात
मुलगा, सून, मुलगी, जावई, नातू असा परिवार आहे. वेंगुर्ला माजी नगरसेवक मनीष परब यांच्या त्या आई व श्रिया परब
यांच्या त्या सासू होत.

You cannot copy content of this page