Headlines

वेंगुर्ला आगारातर्फे मार्लेश्वर बस 24 आँगस्ट रोजी

वेंगुर्ला
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वेंगुर्ला आगारातर्फे शिवक्षेत्र मार्लेश्वर दर्शनासाठी खास श्रावण महिन्यातील सोमवार दि. 24 आँगस्ट रोजी सकाळी 7.30 वा. वेंगुर्ला दाभोलीमार्गे मार्लेश्वर (संगमेश्वर) अशी बस सोडण्यात येणार आहे. हि बस मार्लेश्वर येथून दुपारी 3 वा. वेंगुर्ला येथे जाण्यासाठी निघणार आहे. या देवदर्शन प्रवासी बस चा भाविक प्रवाश्यांनी लाभ घ्यावा. या बस मधून प्रवास करण्याऱ्या 75 वर्षावरील नागरिकांना मोफत प्रवास, महिला व 65 वर्षावरील नागरिकांना हाफ (अर्धे) तिकीट तर उर्वरीत प्रवाशांना फुल (पुर्ण) प्रवासी भाडे द्यावे लागणार आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त भाविकांनी या खास बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वेंगुर्ले आगार व्यवस्थापक नवज्योत गावडे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page