केदार झाड मित्रमंडळाचा उपक्रम ; स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद…
⚡मालवण,ता.२२-:
केदार झाड मित्रमंडळाच्या वतीने वायरी भूतनाथ मंदिर प्रांगणात पारंपरिक ‘नारळ लढविणे’ स्पर्धेचे अतिशय उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कोचरा येथील निलेश घाडी यांनी प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळवले.
या स्पर्धेचे उद्घाटन दाजी सावजी, देवानंद लोकेगावकर, श्याम झाड, केदार झाड, मिलिंद झाड आणि संदीप बोडवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. दिवसभरात रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यांनंतर मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी किसन मांजरेकर व विश्वास गावकर उपस्थित होते.
स्पर्धेत प्रथम विजेता निलेश घाडी यांना ११ हजार १११ रुपये व चषक, द्वितीय विजेता निलेश परब (कातवड) यांना ७ हजार ७७७ व चषक, तृतीय विजेता आकाश तळगावकर (वायरी) १ हजार रुपये, चतुर्थ विजेता हर्षद तळवडेकर (वायरी) १ हजार रुपये देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
स्पर्धेचे पंच म्हणून प्रसन्न तळवडेकर, भूषण आचरेकर, अमित झाड व मुकेश आचरेकर यांनी काम पाहिले.
यावेळी यतीन मालवणकर, दीपक ढोलम, लीलाधर झाड, मोहित झाड, समीर पाटकर, विकी फर्नांडिस, अनिल झाड, आनंद हडकर, संकेत वस्त, मंदार झाड, सिद्धेश केळुसकर, हर्षद हळदणकर, प्रथमेश पुरळकर, भूषण गरगटे, अनिश तळगावकर, सुशांत सुर्वे, रोहित चव्हाण, संदेश झाड यांच्यासह अनेक नागरिक व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समालोचन नाना नाईक, सुशील मोर्ये यांनी केले.
