Headlines

मोती तलावात युवतीची उडी…

वाचविण्यासाठी उडी घेतलेल्या युवकाचा मृत्यू:युवतीचा शोध सुरू..

सावंतवाडी : शहरातील श्रीराम वाचन मंदिर समोर मोती तलावात एका युवतीने उडी घेतल्यानंतर लगेचच एका युवकानेही उडी घेतली. हा प्रकार पाहताच उपस्थितांनी त्या ठिकाणी धाव घेतली युवकाला पाण्यातून बाहेर काढले. मात्र तो मृत झाल्याचे निदर्शनास आले. युवतीचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. ते दोघे नातेवाईक असल्याचे तिथे असलेल्या अन्य एका युवतीकडून सांगण्यात आले. मात्र त्यांनी उडी का घेतली याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. सावंतवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

You cannot copy content of this page