स्वामी समर्थ सांस्कृतिक सभागृहात पार पडणार कार्यक्रम
⚡बांदा ता.११-: संयोजक मनोज गोवेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या दिपावली शोटाईम या कार्यक्रमाने सतत २० वर्षे रसिकांच्या मनात अधिराज्य गाजवले. आजही सर्वाच्या मनात आपले स्थान अबधित ठेवुन आहे. कित्येक कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणारा, विविध सामाजीक व सांस्कृतिक उपक्रम करणारा शोटाईम परीवार आजही बांदा शोटाईम ग्रुप या नावाने कार्यरत आहे. या ग्रुपच्या वतीने पुन्हा एकदा जुन्या आठवणीना उजाळा देण्यासाठी असंख्य दाते, हितचिंतक यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व शोटाईम परीवारातील काही मान्यवरांच्या सत्कार व स्नेहभोजनाचे आयोजन शुक्रवार दिनांक १३ रोजी स्वामी समर्थ संस्कृतिक सभाग्रुहामध्ये सायंकाळी ६ वाजता करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे खास आकर्षण गुरूवार दिनांक १२ रोजी सायंकाळी ५ वाजता मिस ब्युटि, मिस्टर हँण्डसम, व प्रसिध्द स्टँचुची शोभायात्रा शहरातील कट्टा काँर्नर, गांधीचौक, ते बांदेश्वर मंदीर पर्यत काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन शोटाईम ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.
