अन्यथा कारवाई करा;मनसे शिष्टमंडळाची पोलीस निरीक्षकांकडे मागणी
⚡सावंतवाडी ता.११-: सावंतवाडी तालुक्यातील प्रार्थना स्थळावरील आवाजावर मर्यादा घालण्यात यावी तसेच याबाबत योग्य ती कार्यवाही न झाल्यास त्यांच्यावर कारवाई केली जावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडदळाने सावंतवाडी पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांची भेट घेऊन केली यावेळी त्यांनी निवेदन ही सादर केले.
याबाबत योग्य ती कारवाई केली जाणार असून प्रार्थना स्थळंच्या आवाजाची तीव्रता तपासली जाणार आहे असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
यावेळी माजी शहराध्यक्ष तथा म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, माजी उपजिल्हाध्यक्ष अनिल केसरकर, सुधीर राऊळ, परिवहन जिल्हाध्यक्ष राजू कासकर, म.न.वि.से उपजिल्हाध्यक्ष कौस्तुभ नाईक, माजी उपशहर अध्यक्ष शुभम सावंत,दर्शन सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
