⚡मालवण ता.११-: रोटरी क्लब मालवण तर्फे दरवर्षीप्रमाणे २०२२- २३ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता ५ वी व ८ वी ची शिष्यवृत्ती सराव परिक्षा रविवार दि. २९ जानेवारी रोजी टोपीवाला हायस्कूल, मालवण येथे घेण्यात येणार आहे.
या परीक्षेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी आपली नावे लिमये हॉस्पीटल मालवण येथे नोंदवावीत. परिक्षा प्रवेश शुल्क दोन्ही वर्गांसाठी ५० रु. आहे. इंग्रजी व मराठी माध्यमातून ही परिक्षा घेण्यात येणार आहे तरी विद्यार्थ्यांनी नावे नोंदविताना आपल्या परिक्षेचे माध्यम मराठी किंवा इंग्रजी हे सांगणे आवश्यक आहे, याची विद्यार्थ्यांनी व पालकांनी नोंद घ्यावी. नाव नोंदणीची अंतिम तारीख बुधवार दि. २५ जानेवारी असून नोंदणीसाठी संपर्क :- डॉ. लिमये हॉस्पीटल मालवण, फोन नं. ०२३६५- २५२२६६, मोबा. नं. ७०५७९०६६८१ येथे संपर्क साधावा, असे आवाहन रोटरी क्लब मालवणतर्फे करण्यात आले आहे.
