Headlines

विनया सातार्डेकर यांना राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार

⚡देवगड ता.१२-: मुंबई पारस काव्य, कला, जनजागृती संस्था सानपाडा, नवी मुंबई तर्फे राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार नुकताच आदर्श शाळा जोशी विद्यामंदिर जामसंडे नं. १, च्‍या उच्चश्रेणी मुख्याध्यापिका, मसुरे गावाच्या रहिवाशी, आदर्श प्राध्यापिका सौ विनया विजय सातार्डेकर यांना नवी मुंबई सानपाडा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता भवन येथे देण्यात आला. यावेळी विनया सातार्डेकर यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास…

Read More

आळवाडी उद्यानाची तात्काळ साफसफाई करावी

ग्राम पंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांची मागणी ⚡बांदा ता.१२-: शहरात आळवाडी येथे ग्रामपंचायतने लहान मुलांना खेळण्यासाठी तसेच मनोरंजनासाठी उभारलेल्या उद्यानाची देखभाल दुरुस्ती अभावी दुरावस्था झाल्याने या उद्यानाची तात्काळ साफसफाई करून हे उद्यान मुलांसाठी खुले करावे अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर व युवा कार्यकर्ते अर्णव स्वार यांनी केली आहे. यासंदर्भात ग्रामविस्तार अधिकारी…

Read More

संपादकाचार्य बाबुराव पराडकर यांचे जिल्ह्यात स्मारक होण्यासाठी प्रयत्न करावा

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचे पत्रकारांना आवाहन;सावंतवाडी पत्रकार संघाच्यावतीने बाबुराव पराडकर यांना अभिवादन सावंतवाडी : सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्यावतीने संपादकाचार्य बाबूराव पराडकर यांच्या स्मृतिदिनी सावंतवाडीत अभिवादन करण्यात आल. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पराडकर यांच्या स्मृतीस उजाळा देत अभिवादन केले. याप्रसंगी मराठी पत्रकारितेचे जनक आद्यपत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारका प्रमाणेच सिंधुदुर्गचे सुपुत्र तथा हिंदी पत्रकारितेचे पितामह…

Read More

नगर वाचनालयाच्या विविध स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूलचे यश

⚡वेंगुर्ले ता.१२-: जिल्ह्यात आपला वेगळा ठसा निर्माण करणाऱ्या न्यू इग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचा अश्वमेध कायम राखताना वेंगुर्ले नगरवाचनालयात संपन्न झालेल्या विविध स्पर्धेत यश मिळवत आपल्या विद्यालयाची विजयी घोडदौड कायम राखली ज्ञानेश्वरी ओवी पठन स्पर्धेत या विद्यालयाची इयत्ता नववीची विद्यार्थ्यांनी श्रुती शेवडे हिने चतुर्थ क्रमांक पटकावला तीला तिचे वडिल श्रीधर शेवडे यांनी विशेष मार्गदर्शन केले….

Read More

कला, क्रीडा, शैक्षणिक आणि सांस्कृतिकतेला व्यासपीठ देण्याचे काम वेताळ प्रतिष्ठान नऊ वर्षे करीत आहे

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी काढले गौरव उद्गार ⚡वेंगुर्ले ता.१२-: सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कला क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि गेल्या काही वर्षांमध्ये कोकणची लोकपरंपरा असणाऱ्या दशावतार या सर्वांना व्यासपीठ देण्याचे काम वेताळ प्रतिष्ठान सलग नऊ वर्ष करत आहे,अबाल वृद्धांना सामावून घेताना प्रतिष्ठानने सामाजिक भान जपलेले आहे.स्वच्छता, रक्तदान, शालेय उपक्रम, गडकिल्ल्यांचे संवर्धन, रुग्णांना मोफत रूग्णपयोगी साहित्य सेवा…

Read More

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उद्या मासिक सभा

⚡वेंगुर्ला ता.१२-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उद्या १२ जानेवारी २०२३ रोजी तालुका कार्यालयात मासिक सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत पक्षाच्या संघटनात्मक विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या निवडणुकीच्या चर्चा करण्यात येणार आहे. तर पक्षाच्या नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांच्या सत्काराचे नियोजनही यावेळी करण्यात येणार…

Read More

ज्येष्ठ कवी प्रकाश ग. जाधव यांना चंद्रकांत खोत स्मृती पुरस्कार जाहीर

⚡कणकवली ता.१२-: सिंधुदुर्ग सुपुत्र आणि मराठीतील ख्यातनाम लेखक चंद्रकांत खोत यांच्या स्मृती प्रित्यर्थ यावर्षीपासून देण्यात येणाऱ्या चंद्रकांत खोत स्मृती साहित्य पुरस्कारासाठी कोकणातील प्रसिद्ध कवी प्रकाश ग जाधव यांची निवड करण्यात आली आहे. 5,555 रुपये स्मृतीचिन्ह, मानपत्र, शाल आणि पुष्पगुच्छ असे स्वरूप असलेल्या या पुरस्काराने 14 जानेवारी रोजी मुंबई गिरगाव साहित्य संघात होणाऱ्या एकता कल्चर महोत्सवात…

Read More

ओरोसमध्ये गोवा बनावटीच्या दारुसह ६० लाखांचा मुद्देमाल जप्त

एक्साइजच्या कोल्हापूर भरारी पथकाची कारवाई ⚡बांदा ता.१२-: गोव्यातून मुंबईकडे केल्या जाणार्‍या बेकायदा दारु वाहतूकी विरोधात राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर भरारी पथकाने आज सकाळी ओरोस येथे कारवाई केली. या कारवाईत ४८ हजार दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. दारुसह दारु वाहतुकीसाठी वापरलेला कंटेनर (एमएच १२ आरएन ४४०३) असा एकूण ६० लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात…

Read More

आरोंदा येथील अपघातात शिरोडा येथील तरुण जागीच ठार…

⚡वेंगुर्ले ता.१२-: आरोंदा-भटपावणी येथे रात्री झालेल्या अपघातामध्ये शिरोडा येथील युवक जागीच ठार झाला आहे. संदीप उत्तम नाईक (४४) रा. शिरोडा-आंब्याचीभाटी असे त्याचे नाव आहे. कामावरून परतत असताना ही दुर्घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. आरोंदा-भटपावणी येथे संदीप याच्या दुचाकीची समोरून येणाऱ्या रुग्णवाहिकेला जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना काल रात्री…

Read More

जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेचे २१ रोजी आयोजन

मळगाव येथील खानोलकर वाचनालय, कासकर मित्रमंडळ यांचा पुढाकार ⚡सावंतवाडी ता.१२-: कै.प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर मळगाव व कै प्राचार्य रमेश कासकर मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय प्रा रमेश कासकर स्मृती जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेचे आयोजन आयोजन शनिवार दिनांक 21 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता ग्रंथालयाच्या रमाकांत सूर्याची खानोलकर सभागृहात करण्यात आलेले आहे. स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांसाठी…

Read More
You cannot copy content of this page