शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उद्या मासिक सभा

⚡वेंगुर्ला ता.१२-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उद्या १२ जानेवारी २०२३ रोजी तालुका कार्यालयात मासिक सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत पक्षाच्या संघटनात्मक विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.

तसेच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या निवडणुकीच्या चर्चा करण्यात येणार आहे. तर पक्षाच्या नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांच्या सत्काराचे नियोजनही यावेळी करण्यात येणार आहे. तरी या बैठकीला पक्षाच्या सर्व पदाधिकारी, महिला संघटक, शाखाप्रमुख, विभागप्रमुख, युवा सेना पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाप्रमुख यशवंत परब यांनी केले आहे.

You cannot copy content of this page