⚡वेंगुर्ले ता.१२-: आरोंदा-भटपावणी येथे रात्री झालेल्या अपघातामध्ये शिरोडा येथील युवक जागीच ठार झाला आहे. संदीप उत्तम नाईक (४४) रा. शिरोडा-आंब्याचीभाटी असे त्याचे नाव आहे. कामावरून परतत असताना ही दुर्घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
आरोंदा-भटपावणी येथे संदीप याच्या दुचाकीची समोरून येणाऱ्या रुग्णवाहिकेला जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान रुग्णवाहिका चालक प्रवीण प्रभाकर नाईक (रा.आरोंदा-देऊळवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सावंतवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
