Headlines

आंबोली घाटात टेम्पो पलटी

समोरील वाहनाने हुल दिल्याने घडला अपघात;दुखापत नाही मात्र टेम्पोचे मोठे नुकसान ⚡आंबोली ता.१२-: येथील आंबोली घाटात समोर येणाऱ्या कारचालकाने हुल्ल दिल्याने समोरून येणाऱ्या टेम्पो चालकाने ब्रेक मारल्याने टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. हा अपघात आज सायंकाळी आंबोली घाटात घडला असून सुदैवाने कोणाला दुखापत झाली नाही. मात्र टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Read More

राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांचे विचार आजच्या पिढीने आत्मसात करावे

प्राचार्य श्री. वामन खोत यांचे प्रतिपादन ⚡मालवण ता.१२-: जगामध्ये जे तीन महान योद्धे होऊन गेले त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आदराने घेतले जाते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविण्याचे काम राष्ट्रमाता जिजाऊ यांनी केले तर या देशातील तरुणांना नवी दिशा देण्याचे काम स्वामी विवेकानंद यांनी केले. या देशाच्या जडणघडणीत त्याचप्रमाणे…

Read More

दुचाकी घसरून परदेशी पर्यटक जखमी

मळेवाड जकातनाका येथील घटना ⚡सावंतवाडी ता.१२-: दुचाकी घसरून परदेशी पर्यटक अँलेक्स (रशिया) गंभीर जखमी झाला.हा अपघात मळेवाड जकातनाका येथे घडला असून त्याला अधिक उपचारासाठी मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले .त्याच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली असून अधिक उपचारासाठी त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी 108 रुग्णवाहिका बोलवण्यात आली आहे.या अपघातग्रस्त विदेशी पर्यटकाला…

Read More

जिल्हास्तरीय समुहनृत्य स्पर्धेत टोपीवाला प्राथमिक शाळा प्रथम

मालवण, दि प्रतिनिधीतुळस येथील वेताळ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय समूहनृत्य स्पर्धेत येथील टोपीवाला प्राथमिक शाळेच्या शेतकरी नृत्यास प्रथम क्रमांक मिळाला. या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात टोपीवाला प्राथमिक शाळेने सादर केलेल्या शेतकरी नृत्यास प्रथम क्रमांक मिळाला. यात आर्या फोंडेकर, ओजस्वी साळूंके, काव्या पांगे, देवयानी कुलकर्णी, हर्शिता मिटकर, समृद्धी गोवेकर, समिक्षा तोतरे, आयुषा वेंगुर्लेकर, समृद्धी…

Read More

पुरातन संस्कृती, धार्मिक पर्यटन स्थळांचे ई बुक प्रकाशनाला सुरुवात

पेंडूर मांड येथे पेंडूर एक धर्मपीठ ई पुस्तक प्रकाशनाने झाला प्रारंभ;तहसीलदार श्रीपाद पाटील यांनी केली सुरुवात मालवण दि प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्याला पाच हजार वर्षापूर्वीचा इतिहास असल्याने या भागातील पुरातन संस्कृती आणि धार्मिक पर्यटन स्थळे याचा अनमोल ठेवा जगातील १०४ भाषेत ई- बुक च्या माध्यमातून प्रसारित करण्याचे शिवधनुष्य पर्यटन व्यावसायिक महासंघाने उचलले आहे त्याचा शुभारंभ पेंडुर गावचे…

Read More

शिष्यवृत्ती परीक्षेत टोपीवाला हायस्कुलच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश

⚡मालवण ता.१२-: मालवण येथील मालवण एज्युकेशन सोसायटी संचलित अ. शि. दे. टोपीवाला हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत नेत्रदीपक यश मिळविले आहे. इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत एक तर आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत नऊ अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. यात कैवल्य सागर मिसाळ याने ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात दहावा व सिंधुदुर्ग…

Read More

मालवणच्या टोपीवाला हायस्कुलच्या स्नेहसंमेलनात ‘वनराई’चे नेपथ्य ठरले आकर्षण

⚡मालवण ता.१२-: मालवण येथील टोपीवाला हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात यावर्षी पर्यावरण पूरक नेपथ्य साकारण्यात आले. शाळेचे कलाशिक्षक बी. जी. सामंत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या नेपथ्यात रंगभूमीवर हिरव्या वनराईचे चित्र रेखाटत ‘झाडा लावा झाडे जगवा’ असा संदेश नेपथ्याच्या माध्यमातून हटके देण्यात आल्याने तो एक कौतुकाचा विषय बनला मालवण येथील टोपीवाला हायस्कुलचे स्नेहसंमेलन मामा वरेरकर…

Read More

कोकण विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे घवघवीत यश

⚡सिंधुदुर्गनगरी ता.१२-: संचालनालय लेखा व कोषागारे कर्मचारी कल्याण समितीतर्फे आयोजित कोकण विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याने चॅम्पियनशिप चषकासह वैयक्तिक क्रींडा प्रकारात ८ सुवर्ण पदके, ६ रजत पदके व १ कांस्य पदकाची कमाई केली. सांघिक क्रीडा प्रकारात क्रिकेट व हॉलीबॉल (शुटींग) यामध्ये विजेतेपद पटकावून घवघवीत यश संपादन केले. तसेच सिंधुदुर्ग संघाने संचलनामध्ये प्रथम क्रमांकाचे…

Read More

“मकर संक्रांती भोगी” सणाचा दिवस “पौष्टिक तृणधान्य दिन” म्हणून साजरा करावा

कृषि संचालक विकास पाटील ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१२-: आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत “मकर संक्रांती भोगी” हा सणाचा दिवस राज्यामध्ये “पौष्टिक तृणधान्य दिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करावा, असे आवाहन कृषि आयुक्तालयाचे संचालक विस्तार व प्रशिक्षण विकास पाटील यांनी केले आहे.मकर संक्रांतीचा औचित्य साधून प्रत्येक कृषि सहाय्यकांनी आपल्याकडील गावामध्ये प्रशिक्षण कार्यक्रम, आरोग्यावर आधारित चर्चासत्राचे आयोजन, तृणधान्य…

Read More

राज्यस्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेचे मंगळवारी उद्घाटन

⚡सिंधुदुर्गनगरी ता.१२-: राज्यस्तरीय शालेय बुध्दीबळ क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन दिनांक १७ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता मामाचो गाव रिसॉर्ट हिर्लोक येथे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली आहे.यावेळी प्रमुख उपस्थितीत जिल्हा प्ररिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, कोल्हापूर विभागाचे क्रीडा…

Read More
You cannot copy content of this page