⚡मालवण ता.१२-: मालवण येथील मालवण एज्युकेशन सोसायटी संचलित अ. शि. दे. टोपीवाला हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत नेत्रदीपक यश मिळविले आहे. इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत एक तर आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत नऊ अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. यात कैवल्य सागर मिसाळ याने ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात दहावा व सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला आहे.
यामध्ये इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कर्ष मदन भिसे याने जिल्ह्यात ३० क्रमांक मिळवून शिष्यवृत्ती प्राप्त केली. तसेच ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेतसागर मिसाळ (जिल्ह्यात पहिला), आर्यन देविदास प्रभुगावकर (जिल्ह्यात चौथा), सुजल सीताराम परब (जिल्ह्यात १९ वा), वेदांत श्यामसुंदर वारंग (जिल्ह्यात २४), सानिका संजय कांदळगावकर (जिल्ह्यात २९ वी), कैस्तुभ सुनील परुळेकर (जिल्ह्यात ३० वा), सन्मित्र समीर चव्हाण (जिल्ह्यात ३४ वा), विष्मीता अनिल कुबल (जिल्ह्यात ३८ वी), दीप गंगाराम कोकरे (जिल्ह्यात ४६ वा) या विद्यार्थ्यांनी यश मिळविले.
या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. या विद्यार्थ्यांना मयुरी भिसे, दर्शना सामंत, मिलिंद शिरोडकर, नूरजहान नाईक, महेश धामापूरकर, सुनील काळसेकर, अक्षता तांबे, सतीश बनसोडे, विपीन ठाकूर या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्था अध्यक्ष, सर्व सभासद, मुख्याध्यापक श्री. खानोलकर व पर्यवेक्षक श्री. प्रभूखानोलकर यांनी अभिनंदन केले.
