दुचाकी घसरून परदेशी पर्यटक जखमी

मळेवाड जकातनाका येथील घटना

⚡सावंतवाडी ता.१२-: दुचाकी घसरून परदेशी पर्यटक अँलेक्स (रशिया) गंभीर जखमी झाला.हा अपघात मळेवाड जकातनाका येथे घडला असून त्याला अधिक उपचारासाठी मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले

.त्याच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली असून अधिक उपचारासाठी त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी 108 रुग्णवाहिका बोलवण्यात आली आहे.या अपघातग्रस्त विदेशी पर्यटकाला विश्वास चराटकर,प्रसाद राऊत,मनीष केरकर,सुमेश शिंदे यां युवकांनी सहकार्य केले.

You cannot copy content of this page