राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांचे विचार आजच्या पिढीने आत्मसात करावे

प्राचार्य श्री. वामन खोत यांचे प्रतिपादन

⚡मालवण ता.१२-: जगामध्ये जे तीन महान योद्धे होऊन गेले त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आदराने घेतले जाते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविण्याचे काम राष्ट्रमाता जिजाऊ यांनी केले तर या देशातील तरुणांना नवी दिशा देण्याचे काम स्वामी विवेकानंद यांनी केले. या देशाच्या जडणघडणीत त्याचप्रमाणे बलवान भारत बनविण्यात राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांचा सिंहाचा वाटा असल्याने त्यांचे विचार घराघरात पोहोचले तर हा देश समृद्ध आणि बलवान बनेल आणि म्हणून आजच्या पिढीने त्यांचे विचार आत्मसात करावे असे प्रतिपादन मालवणच्या भंडारी ए. सो. ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. वामन खोत यांनी येथे बोलताना केले.

मालवण येथील भंडारी ए सो ज्युनिअर कॉलेज मध्ये आज राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब आणि स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी भंडारी ए. सो. ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य वामन खोत हे बोलत होते यावेळी व्यासपीठावर ज्युनिअर कॉलेजचे प्रा. रुपेश बांदेकर, सौ. संगीता चव्हाण मॅडम, श्री. जी. टी. दळवी, कुमारी पूजा कदम आदी व इतर मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी प्रा. बांदेकर यांनी प्रास्ताविक करून स्वागत केले. यावेळी प्रा. बांदेकर यांनी राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्याची माहिती दिली.

यावेळी बोलताना श्री खोत यांनी जिजाऊंनी जे विचार छत्रपती शिवाजी महाराजांना दिले जे संस्कार दिले ते एवढे ताकदवान आहेत की त्यांनी महाराजांना सोळाव्या वर्षी सांगितले की हा अत्याचार नष्ट कर आणि यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज जगात एक नंबरचे योद्धे म्हणून ओळखले जातात. जसे आपण विचार करतो त्याचप्रमाणे आपण वागतो आणि आपल्या जीवनाला तोच आकार मिळत जातो आपण तसेच घडत जातो आणि यासाठीच आपण आपले विचार नेहमी शुद्ध ठेवायचे.
त्यामुळे आपण नक्की काय करायचे कोणत्या दिशेने चालायचे हे आताच ठरवा असे ते म्हणाले
शेवटी श्री जी टी दळवी यांनी आभार मानले

You cannot copy content of this page