समोरील वाहनाने हुल दिल्याने घडला अपघात;दुखापत नाही मात्र टेम्पोचे मोठे नुकसान
⚡आंबोली ता.१२-: येथील आंबोली घाटात समोर येणाऱ्या कारचालकाने हुल्ल दिल्याने समोरून येणाऱ्या टेम्पो चालकाने ब्रेक मारल्याने टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. हा अपघात आज सायंकाळी आंबोली घाटात घडला असून सुदैवाने कोणाला दुखापत झाली नाही. मात्र टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
