मालवण, दि प्रतिनिधी
तुळस येथील वेताळ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय समूहनृत्य स्पर्धेत येथील टोपीवाला प्राथमिक शाळेच्या शेतकरी नृत्यास प्रथम क्रमांक मिळाला.
या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात टोपीवाला प्राथमिक शाळेने सादर केलेल्या शेतकरी नृत्यास प्रथम क्रमांक मिळाला. यात आर्या फोंडेकर, ओजस्वी साळूंके, काव्या पांगे, देवयानी कुलकर्णी, हर्शिता मिटकर, समृद्धी गोवेकर, समिक्षा तोतरे, आयुषा वेंगुर्लेकर, समृद्धी चव्हाण, निर्भया जाधव, किर्तेश बटाव, गौरेश घाडीगावकर, अलोक धुरत, मिहिर मायबा या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. सर्व पालक, प्रशालेचे कलाशिक्षक बी. जी. सामंत, सदा चुरी यांचे सहकार्य लाभले.
प्रशालेच्या आणि संस्थेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यावेळी
मुख्याध्यापिका वीणा गोसावी
सौ. पेंडूरकर, सौ. चव्हाण, सौ. प्रभूखानोलकर, सौ. कुलकर्णी, सौ. कवटकर, सौ. यादव, श्री. बनसोडे आणि सुधीर गोसावी आणि नृत्यदिग्दर्शक कृष्णा तळाशिलकर उपस्थित होते.
फोटो
तुळस येथील वेताळ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित शालेय समूहनृत्य स्पर्धेत येथील टोपीवाला प्राथमिक शाळेच्या शेतकरी नृत्यास प्रथम क्रमांक मिळाला.
