कणकवली काशिविश्वेश्वर मंदिरात पार पडला राम जन्मोत्सव सोहळा साजरा
कणकवली ता.३०-:राम जन्मला गं सखे राम जन्माला अशा जयघोषात श्री देव काशिविश्वेश्वर मंदिरात रामजन्मसोहळा पार पडला. हा सोहळा भाविकांनी याची देही याची डोळा पाहिल्याने त्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. रामनवमीनिमित्त गेलेे काही दिवस मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. त्यामुळे कणकवली शहरात भक्तिमय वातावरण तयार झाले होते.रामनवमीनिमित्त काशीविश्वेश्वर मंदिरात राम जन्मोत्सव उत्साहात पार पडला….
