डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त ९ रोजी सलग वाचन उपक्रम

⚡मालवण ता.३०-: बॅ. नाथ पै सेवांगण मालवण, बार्टी समतादूत आणि फुले, शाहू, आंबेडकर विचारमंच मालवण यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नाथ पै सेवांगण येथील साने गुरुजी वाचन मंदिर येथे ९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजल्यापासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत सलग वाचन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी व वाचन संस्कृतीची जोपासना करण्यासाठी अशा प्रकारच्या वाचन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थी, नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आदि सर्व या उपक्रमात सहभाग घेऊ शकतात. उपक्रमात सहभागीनी बॅ. नाथ पै सेवांगण येथील साने गुरुजी वाचनालयात उपलब्ध पुस्तकांमधील त्यांच्या आवडीच्या पुस्तकाचे वाचन करायचे आहे. त्यानंतर त्या पुस्तकामधील सारांश उपस्थितांसमोर मांडावा. सहभागीना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागीना दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. नावनोंदणीसाठी लक्ष्मीकांत खोबरेकर ९४२२९४६२१२ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page