एसएसपीएम कॉलेजच्या
१९ विद्यार्थ्यांची सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड

⚡कणकवली ता.३०-: एस एस पी एम काँलेज आँफ इंजिनिअरींग च्या काँम्प्युटर विभागातील १५ विद्यार्थ्यांची, इलेक्ट्रिकल विभागातील ३ तसेच मेकॅनिकल विभागातील १ अशा एकूण १९ विद्यार्थ्यांची करिअर लॅब्स टेकनॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे.
काँम्प्युटर शाखेमधुन मानसी जुवळेकर,सुरज रावळ,यश साटेलकर, राजकुमार सुतार,लोकेश दळवी,मंदार तारी,आशितोष पसारे,काजल निकम, जानवी कोळंबकर,सायली नार्वेकर, कृतांक साने,प्रणिता कोराने, राजवी कोळगे, आफताब सरगुरू,योगिता लोके तसेच इलेक्ट्रिकल विभागातून गौरव शिरवाडकर,चैतन्य आरेकर, गौरव कांबळी व मेकॅनिकल विभागातून अंकुर सोवनी या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. विशेष म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांचे अभियांत्रिकी शिक्षण जून २०२३ मध्ये पूर्ण होणार असुन त्यापुर्वीच त्यांची नोकरीसाठी निवड झाली आहे. सदरची निवड प्रक्रियेसाठी करिअर लॅब्स कंपनीचे मॅनेजर रितेश आचरेकर, रिजनल मॅनेजर अतुल सगर, सिनियर हायरिंग मॅनेजर तिलक गोस्वामी आणि हायरिंग असोसिएट मयंक यादव यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयाला भेट दिली आँनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या टेस्ट तसेच मुलाखतीमधून सदरच्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

एसएसपीएम काँलेज आँफ इंजिनिअरींग मागील २४ वर्षांपासून संस्थापक नारायणराव राणे यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षा निलमताई राणे, उपाध्यक्ष निलेश राणे, सचिव नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली समाजातील विविध स्तरावरील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण ऊपलब्ध करून देत आहे.सदरच्या निवड प्रक्रियेकरीता अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँण्ड प्लेसमेंट आँफिसर प्रा. सोमनाथ मेलसगरे यांनी विशेष प्रयत्न केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा सौ. निलमताई राणे, उपाध्यक्ष निलेश राणे, सचिव नितेश राणे,.प्राचार्य डाँ. अनिश गांगल, प्रशासकीय अधिकारी श्री. शांतेश रावराणे, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page