Headlines

यशाच्या मार्गावर जाण्यासाठी अभ्यासाबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोन हवाच

डॉ.योगेश महाडिक;वामनराव महाडीक विद्यालय तळेरे येथे “विज्ञान जत्रा” ⚡कणकवली ता.३०-: जर उच्च ध्येय गाठायचे असेल तर अभ्यासाबरोबरच आपण आपल्या जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगायला हवा,असे प्रतिपादन शासकीय तंत्रनिकेतन मालवणचे अधिव्याख्याता डाॅ.योगेश महाडिक यांनी केले. वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच अध्ययन संस्था,मुंबई( कोळोशी) यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशालेच्या डॉ.एम.डी देसाई सांस्कृतिक भवनात आयोजित विज्ञान जत्रा…

Read More

क्षय रुग्णदत्त योजनेचा झाला शुभारंभ

टी बी मुक्त भारत अभियान अंतर्गत मातृत्व वरदान फाऊंडेशन आणि पर्यटन व्यावसायिक महासंघ यांचे आयोजन ⚡मालवण ता.३०-: केंद्र सरकारने प्रधानमंत्री टी बी मुक्त भारत अभियानाच्या कोरडा आहार फूड बास्केट योजनेअंतर्गत मातृत्व वरदान फाउंडेशन व पर्यटन व्यावसायिक महासंघ आयोजित क्षय रुग्णदत्त योजनेचा १७ रोजी शुभारंभ करण्यात आला. यावेळी अविसामंत, रविकिरण तोरस्कर, दादा वेंगुर्लेकर, मनोज खोबरेकर, कैसर…

Read More

एसटी विभागीय कार्यशाळेच्या स्क्रॅप यार्ड जवळ आग लागून नुकसान

नगरसेवक सुशांत नाईक यांची घटनास्थळी धाव ⚡कणकवली ता.३०-: कणकवली एसटी विभागीय कार्यशाळेच्या संरक्षण भिंती लगतच्या सुक्या गवताला गुरुवारी दुपारी १२ वा. च्या सुमारास अचानक आग लागून स्क्रॅप यार्ड मधील दहा-बारा फिल्टर व एक फॅन असे साहित्य जळून १५०० रुपयाचे नुकसान झाले आहे. येथील कर्मचाऱ्यांनी लागलेली आग तात्काळ विझवून आटोक्यात आणली. कणकवली एसटी विभागीय कार्यशाळेचे मेकॅनिकल…

Read More

बांदा येथे श्रीरामनवमी उत्साहात साजरी

बांदा दि. 30 (प्रतिनिधी)-बांदा येथे श्री रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. बांदा येथिल श्री विठ्ठल दुपारी ठिक 12 वाजता श्री रामजन्माचा सोहळा थाटात संपन्न झाला.रामनामाचा जयघोष करुन श्री रामाला पाळण्यात घालण्यात आले व सर्वांना सुंठवडा वाटण्यात आला. त्यानंतर  ढोल ताशांच्या गजरात प्रभु रामचंद्रांची पालखी मिरवणुक काढण्यात आली. याच वेळेत प्रतिवर्षाप्रमाणे…

Read More

तळेरे ज्येष्ठ नागरिक संघाचा स्नेह मेळावा उत्साहात 

⚡कणकवली ता.३०-: तळेरे पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे वार्षिक स्नेह मेळावा उत्साहात तळेरे येथील श्रीधर सुर्वे यांच्या यांच्या बागेत झाले. यावेळी पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. या सेवा संघाचा दरवर्षी स्नेह मेळावा उत्साहात होतो. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमाकांत वरुणकर, तर प्रमुख पाहुणे निवृत्त वरिष्ठ पोलिस अधिकारी सुर्यकांत तळेकर होते. यावेळी संस्थापक सुरेश तळेकर, संघाचे सचिव दिलीप पाटिल,…

Read More

कणकवली काशिविश्‍वेश्‍वर मंदिरात पार पडला राम जन्मोत्सव सोहळा साजरा

कणकवली ता.३०-:राम जन्मला गं सखे राम जन्माला अशा जयघोषात श्री देव काशिविश्वेश्‍वर मंदिरात रामजन्मसोहळा पार पडला. हा सोहळा भाविकांनी याची देही याची डोळा पाहिल्याने त्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. रामनवमीनिमित्त गेलेे काही दिवस मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. त्यामुळे कणकवली शहरात भक्तिमय वातावरण तयार झाले होते.रामनवमीनिमित्त काशीविश्‍वेश्‍वर मंदिरात राम जन्मोत्सव उत्साहात पार पडला….

Read More

फुकेरी हनुमंत गडावरील छत्रपती शिवराय स्मारकावर सोलार फ्लड आणि मशाल लाईट लोकार्पण

मनविसे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या उपस्थितीत सुनील राऊळ यांनी वाढविला नारळ ⚡सावंतवाडी-: रामनवमीचे औचित्य साधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने फुकेरी येथील हनुमंत गडावर छत्रपती शिवरायांच्या स्मारकावर सोलार फ्लड लाईट तसेच सोलार मशाल लाईट यांचे लोकार्पण मनसेचे माजी शहराध्यक्ष तथा विद्यार्थी सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या उपस्थितीत करण्यात आले सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान सिंधुदुर्ग विभागाचे जिल्हाध्यक्ष…

Read More

एसएसपीएम कॉलेजच्या
१९ विद्यार्थ्यांची सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड

⚡कणकवली ता.३०-: एस एस पी एम काँलेज आँफ इंजिनिअरींग च्या काँम्प्युटर विभागातील १५ विद्यार्थ्यांची, इलेक्ट्रिकल विभागातील ३ तसेच मेकॅनिकल विभागातील १ अशा एकूण १९ विद्यार्थ्यांची करिअर लॅब्स टेकनॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे.काँम्प्युटर शाखेमधुन मानसी जुवळेकर,सुरज रावळ,यश साटेलकर, राजकुमार सुतार,लोकेश दळवी,मंदार तारी,आशितोष पसारे,काजल निकम, जानवी कोळंबकर,सायली नार्वेकर, कृतांक साने,प्रणिता कोराने, राजवी…

Read More

डॉ. आंबेडकर जयंती निमित्त जिल्हास्तरीय खुली निबंध स्पर्धा

⚡मालवण ता.३०-: बॅ. नाथ पै सेवांगण मालवण, बार्टी समतादूत, फुले, शाहू आंबेडकर विचारमंच मालवण यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय खुली निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या निबंध स्पर्धेसाठी डॉ. बाबासाहेब आबेडकरांनी महिलांना काय दिले ?’ हा विषय आहे. निबंधासाठी १००० शब्दमर्यादा आहे. विजेत्यांना अनुक्रमे रु. १०००, ७००, ५०० व उत्तेजनार्थ दोन क्रमांकांना…

Read More

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त ९ रोजी सलग वाचन उपक्रम

⚡मालवण ता.३०-: बॅ. नाथ पै सेवांगण मालवण, बार्टी समतादूत आणि फुले, शाहू, आंबेडकर विचारमंच मालवण यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नाथ पै सेवांगण येथील साने गुरुजी वाचन मंदिर येथे ९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजल्यापासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत सलग वाचन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी…

Read More
You cannot copy content of this page