माजी खासदार निलेश राणे यांचे जलसंधारण अधिकारी लघु पाटबंधारे विभाग जिप सिंधुदुर्ग यांना पत्र
⚡मालवण ता.१७-: मालवण तालुक्यातील रमाई नदी पात्रातील मसुरे देऊळवाडा हा भाग गाळाने भरला आहे. स्थानिकांना पावसाळ्यात अनेक समस्यांना सामना करावा लागत आहे. गाळाचे प्रमाण वाढल्याने नद्यांची पाणी साठवण क्षमता कमी झाली असून नदी किनारी शेती बागायती मध्ये पाणी घुसून जमीन क्षारयुक्त होण्याचा धोका आहे.
तरी आपल्या यंत्रणे मार्फत अत्याधुनिक यंत्रसामुग्रीच्या साहाय्याने मसुरे देऊळवाडा परिसरातील गाळ उपसा त्वरीत सुरू करून रमाई नदी गाळमुक्त करण्यासाठी सहकार्य करावे. असे पत्र १५ मे रोजी माजी खासदार निलेश राणे यांनी जलसंधारण अधिकारी लघु पाटबंधारे विभाग जिप सिंधुदुर्ग यांना दिले आहे.
