Headlines

भटवाडीतील रस्त्याची कामे तात्काळ पुर्ण करा…

दिपाली भालेकर ; पालिका प्रशासनाला निवेदन ⚡सावंतवाडी ता.१८-: भटवाडी परिसरातील रस्त्याची प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावीत अशी मागणी माजी नगरसेविका सौ दिपाली भालेकर यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी त्यांनी याबाबतचे निवेदन दिले असून, रस्त्यासोबतच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गटारे स्वच्छ करणे, तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाढलेली झाडे तोडणे इत्यादी कामे लवकरात लवकर करावीत. तसेच रस्त्यांवर…

Read More

तळेरे येथे रंगला”गझल नानिवडेकरांची” कार्यक्रम

⚡कणकवली ता १८-: गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांची जयंतीनिमित्त तळेरे येथे “गझल नानिवडेकरांची” हा कार्यक्रम प्रज्ञांगण परिवाराने आयोजित केला होता. या कार्यक्रमात प्रसिध्द गझलकार, ऊत्तम माणूस, मार्गदर्शक, पत्रकार आणि चांगला मित्र असे नानिवडेकर यांचे विविध पैलू मांडताना त्यांच्या अनेक गझलांचे सादरीकरण करण्यात आले. यानिमित्त नानिवडेकर यांच्या विविध आठवणींना उजाळा मिळाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक श्रावणी कंप्यूटरचे संचालक…

Read More

भूविकास बँकांच्या कर्मचाऱ्यांचे
७ वर्षे थकीत पगार मिळाले

कर्मचाऱ्यांनी मानले आ. वैभव नाईक यांचे आभार ⚡कणकवली ता.१८-: राज्यातील भूविकास बँकांच्या कर्मचाऱ्यांचे ७ वर्षे थकीत असलेले पगार व इतर सर्व आर्थिक लाभाची रक्कम कमर्चाऱ्यांना देण्यात आली आहे. त्यासाठी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, तत्कालीन वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केल्याने तसेच सातत्याने अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित…

Read More

तळवणे – कोंडूरा येथे बेकायदा चिरे उत्खनन…

शासनाचा कोट्यावधीचा महसूल बुडाला;मनसेची कारवाईची मागणी सावंतवाडी ता.१८-: तळवणे मळेवाड कोडूरा धाकोरा भागात शासनाचा महसूल बुडवून बेकायदा (चिरे)गौण उत्खनन सुरू असून एका जागेचा एटीएस रिपोर्ट दाखवून दुसर्‍याच जागेत चिरे उत्खनन करण्यात आले आहे. सदर दोन्ही जागांचे सातबारा वेगवेगळे असून एकाच्या परवान्यावर दोन तीन खाणीत उत्खनन सुरु आहे. मुळात प्रत्यक्षात असलेल्या चिरे खाणीपैकी बरेच खाणी या…

Read More

आंबोलीतील दुरावस्त तलाठी कार्यालयाच्या उदघाटनाचा घाट…

जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावा; ग्रामस्थांची मागणी.. आंबोली,ता.१८: येथील तलाठी कार्यालय उदघाटनाच्या प्रतीक्षेत आहे मात्र दुरवस्था झालेल्या इमारतीचे उदघाटन करण्याचा घाट घातला आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने लाखो रुपये खर्च घालून इमारत बांधकाम केली मात्र सध्या अशीच इमारत उदघाटन करून लोकांच्या माथी मारण्याचे प्रकार आहेत.त्यामुळे जनतेच्या पैशातून बांधलेले शासकीय कार्यलय अशा प्रकारे लोकानी का स्वीकारावे असा सवाल उपस्थित होत…

Read More

पुरग्रस्तांची नुकसान भरपाई तात्काळ द्या…

शिवसेना व वंचित कडून तहसीलदारांना निवेदन बांदा/प्रतिनिधीजुलै २०२१ मध्ये आलेल्या महापुरात बांदा व आसपासच्या गावातील ग्रामस्थांचे व दुकानदारांचे झालेले नुकसानीची भरपाई अद्यापपर्यंत मिळाली नसून ती तात्काळ देण्यात यावी यासाठी शिवसेना व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सावंतवाडी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक, उपतालुका प्रमुख आबा सावंत, विभाग प्रमुख सुनील गावडे,…

Read More

कणकवली शहर विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार

समीर नलावडे,बंडू हर्णे यांच्यासह माजी नगरसेवकांनी घेतली प्रशासकांची भेट ⚡कणकवली ता.१८-: कणकवली नगरपंचायत च्या लोकप्रतिनिधींचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर कणकवली नगरपंचायतचा प्रशासकचा कार्यभार कणकवलीचे प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्याकडे देण्यात आला आहे. कणकवली शहराचा कार्यभार आता प्रशासक म्हणून प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्यामार्फत केला जाणार असून, कणकवली चे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांची येत्या काही काळात पदोन्नतीने बदली…

Read More

जागतिक पातळीवर विचार करा आणि स्थानिक पातळीवर कृती करा

डॉ. संभाजी शिंदे;जी-20 अंतर्गत कणकवली कॉलेजमध्ये एकदिवसीय वेबिनार ⚡कणकवली ता.१८-: शाश्वत विकासाच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास मानवाला पारंपरिक ऊर्जेऐवजी अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढवणे गरजेचे आहे. यासाठी सर्वांनी जागतिक पातळीवर विचार करून स्थानिक पातळीवर कृती केली पाहिजे असे मत शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील भूगोल विभागप्रमुख प्रा. संभाजी शिंदे यांनी मांडले. जी-20 अंतर्गत कणकवली महाविद्यालयातील भूगोल विभाग, आजीवन…

Read More

अन्यथा वयाची ७० री पार केलेले सेवानिवृत्त शिक्षक पंचनाद निषेध आंदोलन करणार

⚡कणवकली ता.१८-: मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून २१/०६/२०२२ रोजी ८५ सेवानिवृत्त पदवीधर प्राथमिक शिक्षक, पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक‍ व केंद्रप्रमुख यांना निवडश्रेणी मंजूर करण्यात आली. त्याला आता १० महिन्यांचा कालावधी उलटला तरी एकाही शिक्षकाला प्रत्यक्ष लाभ देण्याबाबत अंतिम सुधारित निवृत्ती वेतन आदेश निघालेला नाही.एकूण ९४ शिक्षकांना अद्यापही लाभ मंजूर करण्यात येत नसल्याने २५/०५/२०२३ अखेरपर्यंत सर्व पात्र शिक्षकांचे…

Read More

ग्रंथालयांचे उपक्रम जनतेपर्यंत पोहचवा

जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे : मालवण येथे सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय कर्मचारी स्नेहमेळावा ⚡मालवण ता.१७-: ग्रंथालय ही दोन चाकी गाडी असून कर्मचारी व संस्था पदाधिकारी हे त्याचे महत्वाचे घटक आहेत. सध्याच्या काळात होणारे विविध नवीन बदल ग्रंथालयांनी स्वीकारून प्रवाहात येणे अपरिहार्य बनले आहे. वाचक आणि त्यांची आवड बदलत आहे. त्यामुळे ग्रंथालयांनी सामाजिक माध्यमांचा वापर करीत…

Read More
You cannot copy content of this page