दिपाली भालेकर ; पालिका प्रशासनाला निवेदन
⚡सावंतवाडी ता.१८-: भटवाडी परिसरातील रस्त्याची प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावीत अशी मागणी माजी नगरसेविका सौ दिपाली भालेकर यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी त्यांनी याबाबतचे निवेदन दिले असून, रस्त्यासोबतच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गटारे स्वच्छ करणे, तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाढलेली झाडे तोडणे इत्यादी कामे लवकरात लवकर करावीत. तसेच रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यात यावेत अशी मागणी केली आहे.
