कासार्डे तर्फेवाडीमधील पिंपळेश्‍वर मंदिरात वार्षिक महोत्सव जल्‍लोषात

⚡कणकवली ता.१७-:
कणकवली तालुक्यातील कासार्डे तर्फेवाडीमधील पिंपळेश्‍वर मंदिरात वार्षिक महोत्सव सोहळा मोठ्या उत्‍साहात व जल्‍लोषात संपन्‍न झाला. याावेेळी माजी आमदार प्रमोद जठार उपस्थित होतेे. त्यांनी कोकणातील लोकांनी मुंबईकडे न जाता येथेच राहून रोजगारभिमुख होण्‍याचे आवाहन उपस्थितांना केले. 

हा वार्षिक महोत्‍सव तीन दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी रात्री ‘आचरा आनंद रंग’ हा श्री विठ्ठल रखुमाई दिंडी भजनचा रंगारंग कार्यक्रम रंगला. यावेळी बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी माजी आम. प्रमोद जठार यांनी रिफायनरी प्रकल्‍पामुळे व पर्यटन स्‍थळामुळे येथील ग्रामस्‍थांना रोजगाराची चांगली संधी उपलब्‍ध होणार असून मुंबईतील चाकरमानी त्‍यामुळे गावाकडे परत वळणार असल्‍याचे तसेच नितीन गडकरी यांच्‍या माध्‍यमातून कोकणातील रस्‍त्‍यासाठी दहा हजार करोड रूपये मंजुर झाल्‍याने येथील रस्‍ते व त्या अंतर्गत पर्यटनाला चालना मिळणार असल्‍याचे सांगितले. तसेच, पिंपळेश्‍वर कासार्डे तर्फेवाडी विकास मंडळाला सभामंडप बांधून देणार असल्‍याचे वार्षिक महोत्‍सवाच्‍या कार्यक्रमात प्रमोद जठार यांनी वचन दिले. 
सोमवारी  5 वाजेपर्यत सत्‍यनारायण महापूजा झाली. त्यानंतर  तर रात्री 9 वा. पियाळीचे बुवा संतोष कानडे, नाडण देवगडचे बुवा संदीप पुजारे, शेळपी वेंगुर्लेचे बुवा दिनेश वागदेकर यांच्‍यात तिरंगी सामना रंगला अणि स्‍थानिक ग्रामस्‍थांनी याचा आस्वाद घेतला.

तर या महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी दहीकाला करून या कार्यक्रमाची सांगता करण्‍यात आली. यावेळी सरपंच निशा नकाशे , उपसरपंच गणेश पाताडे , ग्रामसेवक गजानन कोलते, पोलीस पाटिल महेंद्र देवरूखकर , तंटामुक्‍ती अध्‍यक्ष राजा पाताडे , माजी सरपंच संतोश पारकर , प्रकाश पारकर आदिे मान्‍यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी तर्फेवाडीतील सर्व कार्यकर्ते  व ग्रामस्‍थांनी विशेष परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page