किर्लोस आंबवणेवाडी शाळेच्या शतक महोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन

⚡कणकवली ता.१७-: मालवण तालुक्यातील किर्लोस आंबवणेवाडी पू. प्रा. शाळेच्या शतक महोत्सवीवर्षानिमित्त काढण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन नुकतेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते झाले.

यावेळी रोटरी क्लब कणकवलीच्या अध्यक्ष वर्षा बांदेकर, माजी नगरसेविका मेघा गांगण, प्रसाद बांदेकर, किर्लोस सरपंच साक्षी चव्हाण, उपसरपंच अजित लाड, तंटामुक्ती अध्यक्ष प्रवीण घाडीगावकर, पोलीस पाटील किशोर लाड, रामचंद्र लाड, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहन लाड, उत्सव समिती अध्यक्ष संजय लाड, मुख्याध्यापक शेंगाळ, ग्रा. पं. सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

मालवण तालुक्यातील किर्लोस – आंबवणेवाडी शाळेला१०० वर्षे पूर्ण झाली. याचे औचित्यसाधून सर्व माजी विद्यार्थी व ग्रामस्थ, मुंबईकर एकत्र येऊन उत्सव समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या माध्यमातून गेले वर्षभर विविध कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमाला खास. विनायक राऊत, आम. वैभव नाईक, उद्योजक दत्ता सामंत, शिवसेना नेते ब्रि. सुधीर सावंत, माजी बांधकाम व वित्त सभापती महेंद्र चव्हाण,माजी सभापती सुनील घाडीगावकर, माजी उपसभापती राजू परूळेकर, उद्योजक निपूर घाडीगावकर, बाबा सावंत, सुशांत घाडीगावकर, माजी सरपंच प्रदीप सावंत,सोसायटी चेअरमन स्वानंद भावे यांनी शाळेला भेट देऊन व गावाच्या विकासासाठी सहकार्य केले. तसेच शाळेचे माजी शिक्षक लोणे, संतोष तांबे, श्रीमती हेदुळकर, सौ. वळंजू, सौ. परब, श्री कोचरेकर आदी हातभार लावला होता.

You cannot copy content of this page