Headlines

कणकवली बसस्थानक परिसरातील अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई होणार…

कणकवली : परिवहन मंत्री तथा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ तसेच पोलीस उपमहानिरीक्षक तथा मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी, मुंबई यांच्या निर्देशानुसार सिंधुदुर्ग विभागात अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याअंतर्गत कणकवली बसस्थानकाच्या २०० मीटर परिघातील खाजगी प्रवासी वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी संबंधित चालकांना सूचना देण्यात आल्या. कणकवली बसस्थानक परिसरात प्रवासी वाहतूक…

Read Full News

मळेवाड परिसरात पहिल्याच पावसात बीएसएनएलची इंटरनेट सेवा कोलमडली…

⚡सावंतवाडी ता.०७-: मळेवाड परिसरात पहिल्याच पावसात बीएसएनएल इंटरनेट सेवा पूर्णपणे कोलमडली असून, यामुळे ग्राहक आणि व्यापारी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.पावसाळ्याची नुकतीच सुरुवात झाली असताना पहिल्याच जोरदार पावसाने मळेवाड परिसरातील बीएसएनएल सेवेचा बोजवारा उडाला आहे.या तांत्रिक बिघाडामुळे स्थानिक नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. बीएसएनएल चे ग्राहक ,व्यापारी नेटवर्क नसल्यामुळे हैराण झाले आहे.पहिल्याच…

Read Full News

रेडीचे सुपुत्र प्रितेश राऊळ यांचा आडेलीतील पाणी समस्येबाबत यशस्वी तोडगा…

आडेली माजी सरपंच प्रकाश गडेकर यांची आजही सामाजिक बांधिलकी कायम…. ⚡वेंगुर्ला ता.०६-: वेंगुर्ला तालुक्यातील आडेली आंबेडकरनगर येथील ग्रामस्थांना जुन्या विहिरीवरील पाण्याचा साठा अत्यल्प झाल्याने पाणीटंचाईची निश्चितच मोठी झळ पोहोचली होती. याबाबत संबंधित आडेली ग्रामपंचायत सरपंच तसेच वेंगुर्ला पंचायत समिती अधिकारी यावर यशस्वी तोडगा काढू शकले नव्हते. त्यामुळे नागरिकांना व महिलांना रहाटाद्वारे पाणी काढून हाल सोसावे…

Read Full News

जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात…

शिवस्वराज्य दिनी जि प अध्यक्ष प्रमोद कामत, आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे‍ छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता ६ -: छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याच्या प्रेरणेचा स्मृतीदिन म्हणजे शिवस्वराज्य दिन, आज सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशव्दारामध्ये भगवा स्वराज्य ध्वजसंहितेनुसार ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारण्यात आली….

Read Full News

उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, स्वच्छता आरोग्य सभापती पुनम चव्हाण यांच्यामार्फत एसटी आगारातील विहिरीची स्वच्छता…

⚡मालवण ता.०६-:मालवण एसटी आगार येथील गाळ व झाडी-झुडपे यांनी भरलेली विहीर उपनगराध्यक्ष दीपक पाटकर व स्वच्छता आरोग्य सभापती पुनम चव्हाण यांनी स्व:खर्चाने गाळमुक्त व स्वच्छ करून दिली आहे. मालवण एसटी आगार येथे रोजच्या पाणी वापरासाठी तसेच गाड्या स्वच्छता यासाठी पाण्याचा वापर होत असलेली विहीर गाळ व झाडी-झुडपे यांनी भरली होती. बसस्थानक येथे काही कामानिमित्त गेलेल्या…

Read Full News

हेदूळ येथील कार्यकर्त्यांचा उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मनसेत प्रवेश…

⚡मालवण ता.०६-:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन आणि मनसेचे नेते शिरीष सावंत, संदीप दळवी, जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मालवण तालुक्यातील हेदुळ गावातील अनेक कार्यकर्त्यांनी काल मनसेचे उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मनसेमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी पक्षाच्या वतीने सर्व प्रवेशकर्त्यांचे मनसेची मानाची शाल पांघरून पक्षात अधिकृत स्वागत…

Read Full News

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र-गोवा निवडणुकीत अँड. संग्राम देसाई यांचा दणदणीत विजय…

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या एकजुटीची ताकद; राज्यातील २५ विजेत्यांमध्ये सहावा क्रमांक, वकील संघाकडून अभिनंदन.. सावंतवाडी ता.०६ -: बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा निवडणूक २०२६ मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेचे सदस्य अँड. संग्राम देसाई हे भरघोस मतांनी विजयी झाले. राज्यातील एकूण २५ सदस्यांपैकी सहाव्या क्रमांकाने निवडून येत त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. या विजयाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा…

Read Full News

दोडामार्गला स्वतंत्र सबस्टेशन द्या ; अन्यथा उग्र आंदोलनाचा इशारा…

गोवा दराने वीजपुरवठ्यासाठी थेट गोवा वीजमंत्र्यांची भेट घेणार – नंदन वेंगुर्लेकर.. ⚡दोडामार्ग ता.०६-: दोडामार्ग शहरासाठी स्वतंत्र वीज उपकेंद्र (सबस्टेशन) मंजूर करून त्याचा प्रस्ताव एका महिन्याच्या आत शासनाकडे पाठविण्यात आला नाही, तर सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा आक्रमक इशारा संघटनेचे समन्वयक ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांनी दिला. तसेच गोवा-दोडामार्ग सीमावर्ती भागातील…

Read Full News

ओटवणेत शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा…

विशाल परब व ॲड. अनिल निरवडेकर यांची प्रमुख उपस्थिती; सभामंडपासाठी सहकार्याचे आश्वासन. ⚡सावंतवाडी, ता. ०६-: सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे (देऊळवाडी) येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त सिंहासनाधिष्ठित शिवरायांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करून अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.या कार्यक्रमास भाजपा युवा नेते विशाल प्रभाकर परब, सावंतवाडी उपनगराध्यक्ष ॲड….

Read Full News

बांदा नट वाचनालयात शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा…

⚡बांदा ता.०६-: छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक हे केवळ एका राजाचे सिंहासनारोहण नव्हते, तर स्वाभिमान, स्वराज्य आणि जनकल्याणकारी शासनव्यवस्थेचा विजय होता. शिवरायांनी सर्वसामान्यांच्या मनात स्वत्वाची जाणीव निर्माण केली. आजच्या पिढीने त्यांच्या विचारांचा वारसा जपत राष्ट्रप्रेम, कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकी जोपासणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन शिवव्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी येथे केले. फोटो:-बांदा नट वाचनालयात शिवराज्याभिषेक दिन…

Read Full News

You cannot copy content of this page