Headlines

आमसभेत आरोग्याच्या प्रश्नावरून भाजप-शिवसेना कार्यकर्ते आमनेसामने…

‘भीक मांगो’ आंदोलनाच्या वक्तव्यावरून बाचाबाची: पोलिसांचा हस्तक्षेप, आमदार केसरकरांच्या आवाहनानंतर वाद शांत..

सावंतवाडी ता.१४-: सावंतवाडी तालुक्याच्या आरोग्याच्या प्रश्नावरून आज पार पडलेल्या आमसभेत भाजप आणि शिवसेनेचे पदाधिकारी एकमेकांच्या अंगावर धावून गेले. आरोग्य समितीचे अध्यक्ष एन.बी रेडकर यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या परिस्थितीवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर सरकारकडे आरोग्याच्या प्रश्नावर पैसे नसतील तर आम्ही भीक मांगो आंदोलन करू असे सांगितले यावर शिंदे शिवसेनेचे माजी तालुकाध्यक्ष बबन राणे यांनी भीक मांगो हा शब्द मागे घ्या अशी मागणी केली या मुद्द्यावरून झालेल्या बाचाबाचीतून भाजप आणि शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर गेले मात्र वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे आणि केसरकर यांनी आक्रमक झालेल्या सर्वांनाच शांत राहण्याची विनंती सर्वजण गप्प झाले आपण आरोग्याच्या प्रश्नावर स्वतंत्र बैठक घेऊ यावेळी आपले प्रश्न मांडा अशी मागणी यावेळी केसरकर यांनी केली. एकूणच आरोग्य आणि मल्टीस्पेशालिटीचा विषय आजच्या आमसभेमध्ये चर्चेचा ठरला.
आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील नगर परिषदेच्या बॅ. नाथ पै सभागृहामध्ये सावंतवाडी तालुक्याची आम सभा पार पडली व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, सभापती सुष्मिता जाधव,शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, उपसभापती गौरव मुळीक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले, उपनगराध्यक्ष अनिल दरवडेकर शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रेश्मा सावंत आधी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगरसेवक आधी उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीपासूनच आरोग्याच्या प्रश्नावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले यावेळी आरोग्य समितीचे अध्यक्ष एन बी रेडकर यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या एकूणच परिस्थितीवर बोट ठेवत आरोग्यवस्थेचे वाभाडे काढले, आकृतीबंधामध्ये मंजूर असलेल्या डॉक्टर पैकी फक्त तीनच डॉक्टर रुग्णालयामध्ये कार्यरत आहेत, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ओपीडी दाखवण्याचे काम येथील प्रशासन करत असून दिवसाला सहा रुग्ण गोव्याला रेफर केले जात आहेत ही परिस्थिती नेमकी बदलणार तरी कधी असा प्रश्न उपस्थित करत सरकारकडे पैसे नसल्यास आम्ही भीक मांगो आंदोलन करू असे सांगितले परंतु याच मुद्द्यावरून शिंदे शिवसेनेचे माजी तालुकाध्यक्ष बबन राणे यांनी भीक मांगो हा शब्द मागे घ्या अशी मागणी केली, या विषयावर उपस्थित असलेल्या भाजपा आणि शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बसाबाची निर्माण झाली काही कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले मात्र वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही बाजूंनी कार्यकर्त्यांना थांबवले तसेच आमदार केसरकर यांनी सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले. काही मिनिटातच अशी परिस्थिती शांत झाली. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचा कोल्हापूर विभागातून दोन नंबर आला मुळात दोन नंबर येण्यामागे या रुग्णालयाचे काम निश्चितच योग्य असल्याचे केसरकर यांनी सांगितले जी पदे रिक्त आहेत ती येत्या काही दिवसात भरली जातील तसेच छोट्या-मोठ्या प्रश्नावर आपण निश्चितच लक्षवेधी असे आश्वासन देत आरोग्याच्या प्रश्नावर याच ठिकाणी पुन्हा एकदा विशेष बैठक घेऊ त्यावेळी आपले जे काही प्रश्न असतील ते मांडा असे सांगितले.
तर मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचा प्रश्नही लवकरच सुटणार आहे या संदर्भातील न्यायालयाचा निर्णय लवकरच होणार आहे, 85 कोटीचा अंदाजपत्रक तयार असून ते प्रशासनाकडे सादर केले जाईल, दुसरीकडे आयुष्य ओपीडी सावंतवाडी सुरू होत आहेत त्यामुळे आरोग्याचे प्रश्न निश्चितच सुटतील असे सांगितले.
मात्र याच विषयाला धरून वेत्ये सरपंच गुनाजी गावडे यांनी मल्टीस्पेशालिटी साठी जागा उपलब्ध होत नसल्यास आम्ही जागा देण्यासाठी कधीपासून तयार आहोत त्या ठिकाणी मल्टीस्पेशालिटी उभारा असे स्पष्ट केले उपजिल्हा रुग्णालयांमध्ये उच्च रक्तदाब वाढलेल्या व्यक्तींना सुद्धा गोव्याला रेफर केले जाते ही परिस्थिती आहे त्यामुळे निदान मल्टीस्पेशालिटी तरी उभारा नाहीतर आहे त्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये सुधारणा करा असे सांगितले. यावेळी केसरकर यांनी यासंदर्भात लवकरच निर्णय होणार आहे आणि जागेचा प्रश्न सुटणार आहेत त्यामुळे मल्टीस्पेशालिटी चा मार्ग मोकळा होईल दरम्यान उच्च रक्तदाब रुग्ण संदर्भात त्यांनी अधिक रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी यांचे लक्षवेधक आपण जातीनिशी अशा पेशंट संदर्भात लक्ष द्या अशी सूचना केली. एकूणच आजची झालेली आमसभा आरोग्याच्या प्रश्नावर जास्त लक्षवेधी ठरली.

You cannot copy content of this page