Headlines

आपत्ती काळात सर्व विभागांनी नागरिकांच्या सर्वोच्च सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे…

मालवण तालुका आपत्ती व्यवस्थापन बैठकीत सूचना.. ⚡मालवण ता.०८-:पावसाळ्याच्या कालावधीत मालवण तालुक्यात उद्भवणाऱ्या संभाव्य नैसर्गिक आपत्तींवर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी सर्व विभागांनी सतर्क राहून एकत्रितपणे काम करावे, सर्व विभागांनी नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशा सूचना मालवण तहसील कार्यालयात पार पडलेल्या आपत्ती व्यवस्थापन बैठकीत देण्यात आल्या. मालवण तालुक्यात संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा प्रभावीपणे सामना करता यावा तसेच यापूर्वी…

Read Full News

मालवण शहरात नगरपालिकेची प्लास्टिक विरोधी धडक मोहीम…

१५० किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त.. ⚡मालवण ता.०८-:मालवण नगरपालिका आरोग्य आणि स्वच्छता विभागाच्या वतीने सोमवारी आठवडा बाजाराचे औचित्य साधून शहरात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम राबवण्यात आली. आरोग्य पथकाने सोमवार पेठ आणि देऊळवाडा येथील दुकानांवर अचानक छापे टाकले. या कारवाईमुळे संबंधितात एकच खळबळ उडाली. या कारवाईत तब्बल १५० किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले असून, संबंधित व्यापाऱ्यांवर ६…

Read Full News

तेंडोलीत ‘रावे’ उपक्रमांतर्गत इकोब्रिक्स स्पर्धा…

मुळदे उद्यानविद्या महाविद्यालयाचे आयोजन.. ⚡कुडाळ ता.०८-: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी तेंडोली गावात रावे उपक्रमांतर्गत इकोब्रिक्स स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत भार्गवी मनोज प्रभूतेंडोलकर हिने प्रथम क्रमांक मिळविला. तर द्वितीय तनिष्का विश्वनाथ प्रभू व तृतीय यशस्वी मधुकर मेस्त्री यांनी मिळविला. स्पर्धेत एकूण १०० इकोब्रिक्स गोळा करण्यात…

Read Full News

“एक तरी झाड लावा” संकल्पातून सातार्डा ग्रामपंचायतीचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश…

⚡सावंतवाडी ता.०८-: तालुक्यातील सातार्डा ग्रामपंचायतीच्या वतीने एक तरी झाड लावा हा संकल्प जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सरपंच संदीप उर्फ बाळू प्रभू यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करून करण्यात आला. पर्यावरणाचे औचित्य साधून झाड आणि पर्यावरणाचे महत्त्व यावेळी सांगण्यात आले पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मानवाने वृक्षतोड थांबवावी. पर्यावरणाचे धरतीवर असलेले ऋणानुबंध कायम ठेवावेत असे आवाहन त्यांनी केले.यावेळी…

Read Full News

एस.पी.के कॉलेजचा एनसीसी कॅडेट साहीश तळणकर सुवर्ण पदकाचा मानकरी…

⚡सावंतवाडी ता.०८-: एनसीसी संचलनालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इंटर ग्रुप शूटिंग चॅम्पियनशिप २०२६ राज्यस्तरीय स्पर्धा नुकतीच छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत सावंतवाडी च्या एसपीके कॉलेजच्या एनसीसी कॅडेट कु. साहीश दिगंबर तळणकर याने सुवर्ण पदकाचा…

Read Full News

पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध विकास कामांचा आढावा…

• स्थानिक अडचणी सोडविण्यासाठी संयुक्त बैठका घेण्याचे निर्देश:सर्व कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करा.. सिंधुदुर्गनगरी, दि.०८ (जिमाका):- पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अपूर्ण व रखडलेल्या विकासकामांचे तातडीने वर्गीकरण करून आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. निधीअभावी, परवानगीअभावी किंवा इतर प्रशासकीय कारणांमुळे रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी विशेष यंत्रणा उभारून ती कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी…

Read Full News

बांदा-पानवळ मार्गावर एसटी बस झाडीत घुसली…

सुदैवाने जीवितहानी टळली.. ⚡बांदा ता.०८-: बांदा-पानवळ मार्गावर आज दुपारी एसटी बसचा अपघात झाला. समोरून येणाऱ्या मोठ्या कंटेनरला हूल देताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यालगतच्या झाडीत घुसली. अपघातात बसचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.मिळालेल्या माहितीनुसार, रस्ता अरुंद असल्याने समोरून येणाऱ्या कंटेनरला जागा करून देण्याच्या प्रयत्नात चालकाने बस बाजूला घेतली. यावेळी बस घसरून…

Read Full News

सीईटी सेलचा विभागीय सुसंवाद कार्यक्रम ९ जून रोजी…

CAP प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी-पालकांना थेट मार्गदर्शन; शंकानिरसनाची मिळणार संधी…. ⚡सावंतवाडी ता.०८-: महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्ष, मुंबई यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (CAP) संदर्भात विभागीय सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार, दि. ९ जून रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, भोसले नॉलेज सिटी,…

Read Full News

रस्त्याची गटारे झालीत चक्क कचराकुंडी…

आजगाव, मळेवाड, कोंडुरे, सातार्डा,आरोंदा रस्त्याच्या गटारात कचराचे साम्राज्य.. ⚡सावंतवाडी ता.०८-: शासन एकीकडे कोट्यवधी रुपये खर्च करून जनतेला स्वच्छतेचे धडे देत आहे, तर दुसरीकडे मात्र काही लोकांच्या बेजबाबदार वर्तनामुळे सार्वजनिक व्यवस्था धोक्यात आली आहे.आजगाव , मळेवाड कोंडुरे सातार्डा,आरोंदा या रस्त्यांच्या बाजूची गटारे आता चक्क ‘सार्वजनिक कचरा कुंड्या’ बनल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे.कोणतीही भीती किंवा लाज…

Read Full News

सावंतवाडी एस.टी. बसस्थानक परिसरातील संरक्षक भिंत धोकादायक स्थितीत असून ती तात्काळ दुरुस्त करा…

नगरसेवक आनंद नेवगी व मोहिनी मडगावकर यांची मागणी: धोकादायक झाड तोडण्याची देखील केली मागणी.. ⚡सावंतवाडी ता.०८-: सावंतवाडी एस.टी. बसस्थानक परिसरातील संरक्षक भिंत धोकादायक स्थितीत असून ती तात्काळ दुरुस्त करण्यात यावी, तसेच परिसरातील धोकादायक झाड तोडण्यात यावे, अशी मागणी सावंतवाडी नगरपरिषदेचे नगरसेवक आनंद नेवगी व नगरसेविका मोहिनी मडगावकर यांनी आगार व्यवस्थापकांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात…

Read Full News

You cannot copy content of this page