Headlines

स्मशानभूमीत कचऱ्याचे साम्राज्य; गोबरधन प्रकल्पाची चौकशी करा ..

बांदा शहर विकास आघाडीचे निवेदन; ५० लाखांच्या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह, तातडीने स्वच्छता करण्याची मागणी.. ⚡बांदा ता.०९-: बांदा येथील सार्वजनिक स्मशानभूमी परिसरात गोबरधन प्रकल्पाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आल्याने परिसरात दुर्गंधी, अस्वच्छता आणि रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. स्मशानभूमीसारख्या पवित्र व संवेदनशील ठिकाणी निर्माण झालेल्या या परिस्थितीबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून कचरा तात्काळ…

Read Full News

जिल्हा परिषद बांधकाम विभागात बनावट स्वाक्षरी प्रकरण उघड…

१७ लाखांच्या बिलांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न; ठेकेदारावर जबाबदारी निश्चित, कार्यकारी अभियंता रुजू झाल्यानंतर गुन्हा दाखल करणार; प्रमोद कामत.. ⚡ओरोस ता ९-: बांधकाम कार्यकारी अभियंता यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून १७ लाख १९ हजार रुपयांची विकासकामांची बिले आणि अनामत रक्कम काढण्याचा प्रयत्न झाला. एकूण १३ बिले होती. त्यातील एक नियमित बिल होते. तर बारा अनामत रक्कम परत…

Read Full News

वैश्यवाड्यात गटारे तुंबल्याने रस्त्यांवर तीन फूट पाणी…

मोरी जाम; नगरसेवकांच लक्ष वेधून देखील दुर्लक्ष, सुरेश भोगटेंचा आरोप.. ⚡सावंतवाडी ता.०९-: सावंतवाडी शहरात झालेल्या पहिल्याच जोरदार पावसात अनेक ठिकाणी गटारे तुंबून रस्त्यांवर दोन ते तीन फूट पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. शहरातील वैश्यवाडा येथील जुन्या पोस्ट ऑफिससमोरील वर्षानुवर्षे सुरळीत असलेली मोरी अचानक जाम झाल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी…

Read Full News

इन्सुली चेकनाक्यावर अवैध दारू वाहतुकीवर कारवाई…

दोघे संशयित ताब्यात: चार लाख 2 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.. ⚡​बांदा ता.०९-: इन्सुली चेकनाक्यावर बांदा पोलिसांनी मंगळवारी पहाटेच्या सुमारास केलेल्या धडक कारवाईत गोवा बनावटीच्या बेकायदेशीर दारूची वाहतूक करणारी कार जप्त केली आहे. या कारवाईत मालवण येथील दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. ८३ हजार रुपयांच्या दारुसह एकूण ४ लाख २ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त…

Read Full News

शाळांमधून बेकायदेशीर वह्या पुस्तके विक्रीची सखोल चौकशी होणार…

जि प अध्यक्षांचे शिक्षणाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश:रुपेश पावसकर यांनी घेतली अध्यक्षांची भेट.. कुडाळ : शाळा व संस्था मार्फत वह्या पुस्तके यांची होणारी बेकायदेशीर विक्री संदर्भात जि.प.सदस्य रुपेश पावसकर यांनी अध्यक्ष प्रमोद कामात यांचे लक्ष वेधले. त्यावर अध्यक्ष श्री. कामत यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय व खाजगी शाळा महाविद्यालय मध्ये बेकायदेशीर वह्या…

Read Full News

नागपूरच्या धर्तीवर ओटीपी विरहीत सिलेंडर गँसची सेवा द्या…

जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी:गॅस सिलेंडर ४ दिवस आधी बुक करा, अन्यथा ७ दिवसांनी बुकिंग रद्द – गॅस डीलर्स असोसिएशनचे आवाहन.. ⚡सिंधुदुर्गनगरा ता ९-:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बीपीसीएल, आयओसीएल आणि एचपीसीएल या तिन्ही कंपन्यांच्या एलपीजी गॅस वितरकांनी सिंधुदुर्ग जिल्हा गॅस डीलर्स असोसिएशनच्या वतीने सर्व गॅस ग्राहकांना संघटनेचे खजीनदार नंदकिशोर करावडे यानी पत्रकार परीषदेतुन आवाहन केले आहे. तर नागपूरच्या धर्तीवर सिंधुदुर्ग…

Read Full News

वाडातर घरफोडीचा अवघ्या काही दिवसांत छडा…

पाच लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त, संशयित गजाआड.. ⚡देवगड ता.०९-:वाडातर येथील एका घरफोडी प्रकरणाचा यशस्वी छडा लावत देवगड पोलिसांनी चोरीस गेलेले सुमारे पाच लाख रुपये किमतीचे पाच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत केले असून या प्रकरणातील एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. तांत्रिक तपास आणि पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे गुन्ह्याचा उलगडा करण्यात यश आल्याने पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक…

Read Full News

सीईटी सेलचा ‘विभागीय सुसंवाद २०२६’ उत्साहात संपन्न…

केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी-पालकांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन.. ⚡सावंतवाडी ता.०९-: महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्ष, मुंबई यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (CAP) संदर्भातील विभागीय सुसंवाद कार्यक्रम आज यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत सविस्तर…

Read Full News

१४ कामे स्वखर्चातून केली असतील तर मी गटनेता पदाचा राजीनामा देईन…

अन्यथा सामंतांनी जिल्हाध्यक्ष पद सोडावे” – दिपक सुर्वे यांचा इशारा.. ⚡मालवण ता.०९-:खोटे बोला पण रेटून बोला ही आतापर्यंतची दत्ता सामंत यांची राजकीय नीतीच राहिली आहे. त्यामुळे जर माझ्या चिंदर गावात दत्ता सामंत यांनी स्व:खर्चातून १४ विकासकामे केली असतील तर मी माझ्या पंचायत समिती गटनेता पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे. अन्यथा दत्ता सामंत यांनी आपल्या शिवसेना…

Read Full News

वैभव नाईक यांच्या चौकशीत पक्षपातीपणा ; प्रसंगी शिवसेना स्टाईल उत्तर…

ठाकरेसेनेचे अमरसेन सावंत यांनी दिला थेट इशारा :कालेली ग्रामस्थांचा ठाकरेसेनेवरच विश्वास .. ⚡कुडाळ ता.०९-: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या पाठीशी पक्ष आणि सर्व शिवसैनिक खंबीरपणे उभे आहेत. शासकीय यंत्रणांचा आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा सर्रास गैरवापर करून सुरू असलेल्या चौकशांना वेळ पडल्यास ‘शिवसेना शैली’त चोख उत्तर दिले जाईल, असा थेट इशारा…

Read Full News

You cannot copy content of this page