Headlines

महागाई, गॅस टंचाई व इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक…

सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांवर तहसीलदार-प्रांत यांना निवेदन; आमदार दीपक केसरकर यांचा ही केला निषेध.. ⚡सावंतवाडी ता.१० : वाढती महागाई, गॅस सिलेंडर दरवाढ, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती आणि निर्माण झालेल्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील निष्क्रिय आमदार तथा माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या भूमिकेचाही…

Read Full News

हा तर सर्वांचा विजय…

ऍड. संग्राम देसाई :ऍड. संग्राम देसाई यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव,महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलच्या निवडणुकीत देदीप्यमान यश.. ⚡कुडाळ ता.१०-: महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या निवडणुकीत मिळालेला हा विजय माझा एकट्याचा नसून मला अहोरात्र साथ देणाऱ्या माझ्या सर्व सहकारी वकिलांचा, हितचिंतकांचा आणि मला नेहमीच ऊर्जा देणाऱ्या माझ्या सिंधुदुर्गवासीयांचा आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या माध्यमातून वकिलांचे प्रश्न सोडवणे यासाठी…

Read Full News

ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी सक्ती रद्द करा…

पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवू नका — मनिष दळवी.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१०-: सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांना पत्र पाठवून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ मध्ये AGRISTACK फार्मर ID सक्तीचा न करण्याची विनंती केली आहेशासन निर्णयानुसार योजनेत माहिती भरताना फार्मर ID बंधनकारक करण्यात आला आहे….

Read Full News

एकाच रात्री सहा बंद घरांवर घरफोडीचा प्रयत्न…

खारेपाटण : कणकवली तालुक्यातील नडगीवे येथील धुरीभाटले वाडीमध्ये एकाच रात्री तब्बल सहा बंद घरांवर अज्ञात चोरट्यांनी घरफोडीचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या या वाडीत अनेक कुटुंबे नोकरी व व्यवसायानिमित्त मुंबईत…

Read Full News

ऍड. संग्राम देसाई यांचे कुडाळ रेल्वेस्थानकावर जल्लोषी स्वागत…

ऍड. देसाई यांचे महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या निवडणुकीत यश:वकील आणि कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठानने दिल्या शुभेच्छा.. ⚡कुडाळ ता.१०-: महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या अत्यंत चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या निवडणुकीत सिंधुदुर्गचे सुपुत्र आणि नामवंत विधीज्ञ ॲड. संग्राम देसाई यांनी सलग दुसऱ्यांदा घवघवीत विजय संपादन केला आहे. या ऐतिहासिक विजयानंतर त्यांचे प्रथमच जिल्ह्यात आगमन झाले असून,…

Read Full News

महायुती सरकारने महागाईच्या खाईत लोटले…

परशुराम उपरकर:महिलांना दीड हजार देऊन आता महागाई करत लूट चालू; राज्यात ५१ लाख लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र.. ⚡कणकवली ता.१०-: महाराष्ट्र शासनाने निवडणुकीपूर्वी सरसकट महिलांना १५०० रुपये देऊन लाडकी बहीण योजना आणली. आता कार्यवाही करताना ५१ लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. तसेच २१ हजार शासकीय आणि निमशासकीय महिलांनी लाभ घेतले. २६ हजार पुरुष लाभार्थी आढळले आहेत….

Read Full News

प्लास्टिकमुक्त कलमठसाठी ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम…

१ किलो प्लास्टिक जमा करा, २ किलो साखर मिळवा; सरपंचांच्या मानधनातून खर्च.. ⚡कणकवली ता.१०-: गाव प्लास्टिकमुक्त करण्यासाठी कलमठ ग्रामपंचायतीने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. नागरिकांनी आपल्या घरात प्लास्टिक पिशव्या येणार नाहीत याची काळजी घ्यावी तसेच सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक कचरा टाकू नये, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे. घरात साचलेले प्लास्टिक गोळा करून ग्रामपंचायतीकडे जमा…

Read Full News

भरवस्तीत महिलेची सोन्याची चैन हिसकावली; सावंतवाडीत खळबळ…

⚡सावंतवाडी ता.१०-: सावंतवाडी शहरात भर वस्तीत कॉसमॉस बिल्डींगच्या परिसरात ठाकूर नामक महिलेच्या गळ्यातील चैन मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञात चोरटयांनी हिसकावून पलायन केले. ही घटना आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली .सदरचे दोन तरुण त्यांच्या पेहरावावरून बिहारी असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ते कैद झाले आहेत . घटनेची माहिती समजताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून…

Read Full News

इन्सुली घाटातील धोकादायक झाडे तातडीने तोडा…

जि. प. सदस्य नितीन राऊळ यांच्याकडून निवेदन सादर.. ⚡बांदा ता.०९-:इन्सुली घाट परिसरातील धोकादायक झाडे तातडीने हटवण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य नितीन एकनाथ राऊळ यांनी केली आहे. याबाबत त्यांनी सावंतवाडीचे वनक्षेत्रपाल यांना निवेदन सादर केले आहे. इन्सुली घाटात मुख्य रस्त्यालगत अनेक मोठी झाडे धोकादायक अवस्थेत उभी आहेत. या मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अशा परिस्थितीत…

Read Full News

घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कचरा वर्गीकरण 4 प्रकारात करावे …

श्री. दिलीप गिरप ; वेंगुर्ला न.प. मार्फत 21 जून रोजी जागतिक योग दिन व्यापक स्तरावर.. ⚡वेंगुर्ला ता.०९-: घनकचरा अधिनियम 2026 अंतर्गत कचऱ्याचे 4 प्रकारात वर्गीकरण करण्याचे शासनाचे नवीन निर्देश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार वेंगुर्ला शहरातील नागरिकांनी 2 ऐवजी 4 प्रकारात कचरा वर्गिकरण करून द्यावे. याबाबत नगरपरिषद मार्फत, विविध संस्थामार्फत, नागरिकांमार्फत तसेच घंटागाड्याद्वारे नियोजन करण्यात येणार…

Read Full News

You cannot copy content of this page