Headlines

*भोसले फार्मसी कॉलेजमध्ये १३ जूनला फार्मसी करिअर मार्गदर्शन सत्र…

⚡सावंतवाडी ता.११-: येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी फार्मसी अभ्यासक्रम व करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन शनिवार १३ जून रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर आयोजित या सत्रात सीईटी सेल मार्फत होणारी प्रवेश प्रक्रिया, कॅप राउंड्स, प्राधान्यक्रम भरण्याची पद्धत, आवश्यक कागदपत्रे तसेच विविध शिष्यवृत्ती…

Read Full News

निरवडे झरबाजार परिसरातील धोकादायक आकाशिया झाडे हटवली…

सावंतवाडी-शिरोडा महामार्ग वाहतुकीसाठी सुरक्षितग्रामस्थ व वाहनचालकांच्या मागणीची दखल.. ⚡सावंतवाडी ता.११-:सावंतवाडी शिरोडा महामार्गावर निरवडे झरबाजार नजीक जुन्या कौल फॅक्टरी समोर रस्त्याच्या दुतर्फावर वाळलेली आणि वाहतुकीस धोकादायक ठरणारी आकाशियाची झाडे अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने हटवित रस्ता पावसाळ्यात वाहतुकीसाठी सुरळीत केला आहे. ग्रामस्थांची आणि वाहनधारकांची असलेली मागणी लक्षात घेता बांधकाम विभागाने दाखवलेल्या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त होत आहे.सावंतवाडी शिरोडा…

Read Full News

जिल्हा काँग्रेसकडून राष्ट्रीय बुदधिबळपटू बाळकृष्ण पेडणेकर याचा सत्कार…

⚡सावंतवाडी ता.११-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अव्वल मानांकित सावंतवाडीतील युवा राष्ट्रीय बुदधिबळपटू बाळकृष्ण कौस्तुभ पेडणेकर याचा नवनियुक्त सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्री.अरविंद मोंडकर यांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा काँग्रेस आणि सावंतवाडी तालुका काँग्रेस यांच्या माध्यमातून हा विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते ॲड.दिलीप नार्वेकर, प्रदेश सरचिटणीस साईनाथ चव्हाण, महिला…

Read Full News

गुणवंतांचा गौरव, समाजाचा अभिमान…

सकल मराठा समाज सिंधुदुर्गतर्फे दहावी-बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा १३ जून रोजी सत्कार सोहळा.. ⚡सावंतवाडी ता.११-: सकल मराठा समाज सिंधुदुर्गच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावी व बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि. १३ जून रोजी सायंकाळी ४ वाजता मांगिरीश बॅन्क्वेट हॉल, राजवाड्याच्या पाठीमागे,…

Read Full News

गुळदुवे येथे शेतकऱ्यांना गोकृपा अमृतम जीवाणू संवर्धनाबाबत मार्गदर्शन…

⚡सावंतवाडी ता.१०-:रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय व शाश्वत शेतीला चालना देण्याच्या दृष्टीने, गुळदुवे येथे कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांसाठी “गोकृपा अमृतम “या जीवाणू संवर्धनाचे प्रात्यक्षिक दाखवून उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमात विविध विषय हाताळण्यात आले.यात “शेत बचाओ अभियान “बाबत शास्त्रज्ञ कृषी विज्ञान, केंद्र किर्लोस चे बाळकृष्ण गावडे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.आत्मा BTM मीनल परब…

Read Full News

वाडा येथे कृषी विभागाचा धडक छापा ….

अवैध सेंद्रीय खताचा ५७ हजारांचा साठा जप्त ; वाहतुकीसाठी वापरलेला ट्रकही ताब्यात, तालुक्यात खळबळ.. ⚡देवगड ता.१०-:देवगड तालुक्यातील वाडा येथे अवैधरीत्या साठवून ठेवलेल्या सेंद्रीय खताच्या साठ्यावर तालुका कृषी विभागाने बुधवारी सायंकाळी धडक कारवाई करत सुमारे ५७ हजार रुपये किमतीचे खत आणि त्याच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रक जप्त केला. तसेच संबंधित गोडावून सील करण्यात आले असून या…

Read Full News

वेंगुर्ला तालुक्यात ऐन पावसाळ्यात वीज वितरण अधिकारी बदल्या…

श्री. सचिन वालावलकर ; बदल्या स्थगितीसाठी पालकमंत्री यांची भेट घेणार.. ⚡वेंगुर्ला ता.१०-: वेंगुर्ला तालुक्यातील विज वितरणात तात्काळ सुधारणा करण्याबाबत विज वितरण उपविभाग वेंगुर्ला यांना वेंगुर्ला तालुका शिवसेना शिष्टमंडळाने आज बुधवारी (10 जून ) भेट घेऊन निवेदन सादर केले. वेंगुर्ला तालुक्यात विज वितरणाबाबत अनेक समस्या असून याबाबत नागरीकांच्या तक्रारी शिवसेना कार्यालयात प्राप्त झाल्या असून वारंवार लाईट…

Read Full News

वेंगुर्ला वीजवितरण मार्फतमठ गावातील अपूर्ण कामास तातडीने सुरुवात…

भाजपच्या अजित नाईक यांची प्रत्यक्ष कृतिद्वारे विरोधकांना चपराक.. ⚡वेंगुर्ला ता.१०-: वेंगुर्ला मठमार्गे सावंतवाडी या मुख्य मार्गांनजिक अपूर्ण कामाबाबत शासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. दरम्यान याबाबत मठ भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी अजित नाईक यांनी विद्युत वितरण विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांची तातडीने भेट घेऊन बुधवारी सकाळपासून तीन ठिकाणी अंडरग्राउंड वीजवाहिन्या खोदाई काम तातडीने हाती घेण्यात आले.मठ…

Read Full News

मालवण येथे १३ रोजी “समुद्ररक्षक संमेलन २०२६” चे आयोजन…

⚡मालवण ता.११-:समुद्र संवर्धन, किनारी पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकास या विषयांवर व्यापक जनजागृती करण्याच्या उद्देशाने बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण, सागरशक्ती (Oceans and People), वनशक्ती, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, युथ बिट्स फॉर क्लायमेट, मालवण नगरपरिषद, नीलक्रांती आणि महाराष्ट्र वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “समुद्ररक्षक संमेलन २०२६” चे आयोजन शनिवार, दि. १३ जून रोजी सकाळी ९.३०…

Read Full News

अष्टगणकोट समर्थगड येथे स्वामी भक्तांचे श्रमदान…

३ किमी रस्त्याची डागडुजी:सेवेच्या भावनेतून भक्तांचा पुढाकार.. ⚡मालवण ता.०२-:भक्ती आणि सेवेची अनोखी प्रचिती देत, अष्टगणकोट समर्थगड आडवली येथे स्वामी भक्त आणि सेवेकरी यांच्या अभूतपूर्व श्रमदानातून स्वामी समर्थ मठाकडे येणाऱ्या सुमारे ३ किलोमीटर रस्त्याची डागडुजी करण्यात आली. केवळ सेवेच्या भावनेतून भक्तांनी एकत्र येत हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे योग्य बनवला आहे. हा रस्ता पक्का डांबरी करावा अशी…

Read Full News

You cannot copy content of this page